पिरळे परिसरातील रस्तेबाबत वारंवार मागणी करूनही रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष : प्रमोद शिंदे
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- पिरळे परिसरातील रस्ते सध्या मृत्यूचा सापळा बनले आहेत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचा व सामान्य नागरिकांचा प्रवास धोक्यात आला आहे म्हणून १६ मार्च रोजी दरम्यान तीव्र आंदोलनाचा इशारा प्रमोद शिंदे यांच्याकडून देण्यात आला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अपघातांचे सत्र वाढले आहे.
पिरळे ते पिरळे चौक, शिवपुरी ते पिरळे चौक आणि एकशिव कुरबावी या मुख्य रस्त्यांची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असून, रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास १६ मार्च दरम्यान प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा 'एन.डी.एम.जे.'चे राज्य प्रसिद्धीप्रमुख व उपविभागीय दक्षता नियंत्रण समिती नि. सदस्य प्रमोद शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.विद्यार्थ्यांचा प्रवास काटेवरची कसरत ठरत असून या मार्गावरून वालचंदनगर, नातेपुते, शिवपुरी, पिरळे आणि बारामती या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान होत असून, विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा येथे छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत. हा रस्ता जणू मृत्यूलाच निमंत्रण देत असल्याची संतप्त भावना परिसरातून व्यक्त होत आहे.रस्त्याचे काम सुरू न झाल्यास होणाऱ्या तीव्र आंदोलनास व त्यातून उद्भवणाऱ्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

No comments:
Post a Comment