माणगाव तालुका मंडळ स्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीरांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, March 16, 2026

माणगाव तालुका मंडळ स्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीरांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी

 माणगाव तालुका मंडळ स्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीरांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न तात्काळ मार्गी 




शिबिराला नामदार अदितीताई तटकरे आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांची उपस्थिती 

        बोरघर /  माणगाव ( विश्वास गायकवाड  )  मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस सो. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. एकनाथ शिंदे सो, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्रीम. सुनेत्राताई पवार सो, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. ना. श्री. चंद्रशेखरनी बावनकुळे सो महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशाप्रमाणे महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१ ची घोषणा करण्यात आली आहे, त्याअनुषंगाने माणगाव तालुक्यामध्ये प्रत्येक मंडळ स्तरावर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
       त्या अनुषंगाने दिनांक १८/०२/२०२६ से १३/०३/२०२६ या कालावधीमध्ये माणगाव तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, सर्व धाम महसूल अधिकारी व तहसील कायर्यालय माणगाव येथील अधिकारी/ कर्मचारी यांनी प्रत्येक गावामध्ये जाउन गाव मेटोद्वारे अभियानाबावत जनजागृती करुन लोकांचे अर्ज प्राप्त करुन घेतले तसेच शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या दाखल्यासाठी प्रत्येक शाळेत जाऊन दाखल्यासाठी अर्ज प्राप्त करुन घेतले.
 आज दिनांक १४/०३/२०२६ रोजी माणगाव तालुका महसूल विभागाच्या माध्यमातून मोर्बा आणि इंदापूर मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तर दुसरीकडे मंडळ इंदापूर अंतर्गत मंगेशी मंगल कार्यालय इंदापूर येथे शिवीराचे आयोजन करण्यात आले होते. मोर्बा मंडळ स्तरावरील शिबीरास नामदार अदिती ताई तटकरे आणि जिल्हाधिकारी डॉ किशन जावळे साहेब आवर्जून उपस्थित होते. तर इंदापूर मंडळ स्तरावरील शिबीराच्या वेळी मा.ना. कु. आदितीताई तटकरे, मंत्री, महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सदर अभियानाबाबत मार्गदर्शन केले तसेच महसूल विभागाच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल महसूल विभागाचे अभिनंदन केले, सर्व लाभार्थांना या शिबीराचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले.
        सदर शिबीरामध्ये माणगाव तालुक्यातील महसूल विभागामार्फत व इतर शासकीय विभागामार्फत त्यांच्याकडील सेवा नागरिकांना देण्यात आल्या. महसूल विभागामार्फत ९ उत्पन्नाचे दाखले, ९ वय अधिवास दाखले,  नॉनक्रिमिलेअर दाखले, २५ जातीचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच जिवंत ७/१२ अंतर्गत मक्त व्यक्तीच्या वारसांची नोंद घेऊन व प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करुन ७२ लाभार्थ्यांना शिबीर ठिकाणी डिजिटल ७/१२ व ८अ वाटप करण्यात आले. ७२ फेरफार निकाली काढण्यात आले. ४५ लाभाध्यांचे नवीन आधारकार्ड करीता नोंदणी करण्यात आली. १३ नवीन रेशनकार्ड, ३ लाभार्थ्यांना एम. आर.ई.जी.एस. अंतर्गत गुरांचा गोठा, १२ लाभार्थ्यांचे संजयगांधी योजनेचे फॉर्म भरुन घेण्यात आले. १६ लाभार्थ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतक-यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले, एकात्मिक बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत ८ गरोदर मातांना किट देण्यात आले. २२ लाभाध्यांचे अंधीस्टक करीता ऑनलाईन मंजूरी देण्यात आली. तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालया मार्फत १११ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच २४१ लाभाच्यांचे आयुष्यमान भारतकार्ड साठी नोंदणी करण्यात आली. तसेच पंचायत समिती माणगाव मार्फत एकुण ५ लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल पूर्ण केल्या बाबत प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच तालुका कृषी कार्यालय माणगाव मार्फत पी. एम. किसान ऑनलाईन येक ७४ लाभार्थी, १३ पी. एम. किसान केवायसी करण्यात आले. २८ लाभाव्यांचे कृषी सर्वेक्षण फॉर्म भरण्यात आले. भूमी अभिलेख कार्यालय माणगाव यांचेमार्फत सर्व लाभार्थ्यांना त्यांचे विभागाच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. तसेच तालुका कृषि कार्यालयामार्फत १ लाभाध्यांना ट्रक्टर वाटप करण्यात आले
       सदर शिबीरास मा.ना. कु. अदितीताई तटकरे, मंत्री महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, मा. डॉ. श्री. संदीपान सानप उपविभागीय अधिकारी माणगाव, मा. श्री. विपीन लोकरे तहसीलदार माणगाव, नवनिर्वाचीत जिल्हा परिषद सदस्य श्रीम, दिशा दिपक जाधव, नवनिर्वाचीत पंचायत समिती सभापती श्री. विलास शिंदे, नवनिर्वाचीत पंचायत समिती उपसभापती श्रीम. मनिषाताई मालोरे, तसेच नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्या शुभदा पाटील गटविकास अधिकारी माणगाव, श्री. गणेश सोनार उपअधीक्षक भूमी अभिलेख माणगाव, श्रीम. अस्मिता बिरजे, एकात्मोका बालविकास अधिकारी माणगाव, श्रीम, रोशनी पंदिरकर, आरोग्य अधिकारी माणगाव, श्री. विपुल दूमे निवासी नायब तहसीलदार माणगाव, तसेच इंदापूर विभागातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, इंदापूर विभागातील सामाजिक कार्यकर्ते सर्व पदाधिकारी, पत्रकार बांधव, माणगाव तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी/ कर्मचारी, माणगाव तालुका प्रशासनातील कर्मचारी, माणगाव तालुक्यातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages