शतायुषी चन्नवीरय्या स्वामीजींच्या पाचव्या पुण्याराधनानिमित्त नागणसूर येथे विविध कार्यक्रम
नागणसूर (कटूसत्य वृत्त):-अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील श्री गुरु बम्मलिंगेश्वर बृहन्मठात शतायुषी लिं.चन्नवीरय्या स्वामीजी यांच्या पाचव्या पुण्याराधना कार्यक्रमानिमित्त मठाधिपती श्री श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि १५ ते २६ मार्च दरम्यान विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १५ मार्च सकाळी ८.०० वाजता जगद्गुरु पंचाचार्य ध्वजारोहण मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी, कडबगांवचे वीरशिवलिंगेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी जिंतूरचे अमृतेश्वर शिवाचार्य स्वामीजी व शहापूरचे सुगरेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांची उपस्थिती लाभणार आहे.सायं.७.३० वा. गौडगांवचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हेमरेड्डी मल्लम्मादेवी पुराणाचे उदघाटन उपसरपंच शांताबाई प्रचंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पुराणिक वीर विश्वाराध्य शास्त्री (गोरटा) यांना संगीतकार लिंगय्या स्वामी, तबला वादक गुरुस्वामी यांची साथ लाभणार आहे. सोमशेखर हिरेमठ, सिध्दलिंग शास्त्री, सिध्दय्या कवडी यांच्या वैदिकत्वाखाली चिदानंद मठपती व सोमय्या मठपती यांच्या सहकार्याने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. शुक्रवार दि. २० मार्च रोजी रात्री ८.०० वाजता काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात श्रीमती सितामाता शेळके प्रशालेच्या आदर्श विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा होणार आहे.आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते लिं. वासप्पा करोटे व लिं.गंगाबाई करोटे यांच्या स्मरणार्थ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.अंदेवाडीचे वीरभद्र शिवाचार्य स्वामीजी, सलगरचे शिवबसव स्वामीजी यांचा विशेष गौरव सन्मान करण्यात येणार आहे.नूतन जि.प. सदस्य सिध्दाराम शिवमूर्ती,तंटामुक्त अध्यक्ष प्रशांत प्रचंडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.कै.श्रेया विश्वनाथ शिवणगी यांच्या स्मरणार्थ शेळके प्रशालेच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात येणार आहे. बुधवार दि. २५ मार्च रोजी सायंकाळी ७.०० वाजता पूज्य शतायुषी लिं.चन्नवीरय्या स्वामीजी यांच्या आत्मज्योतीचे प्रज्वलन औसाचे डॉ.शांतवीर शिवाचार्य स्वामीजी, नावंदगीचे शिवयोगी शिवाचार्य स्वामीजी, अक्कलकोटचे बसवलिंग स्वामी, कलहिप्परगाचे गुरुशांतलिंग शिवाचार्य स्वामीजी, हत्तीकणबसचे प्रभू प्रशांत स्वामीजी,उतनाळचे शिवपुत्रय्या स्वामीजी, करिबंटनाळचे शिवकुमार स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.गुरुवार दि. २६ रोजी सकाळी ६.०० वा. पूज्य श्री. लिं. शतायुषी चन्नवीरय्या स्वामीजींच्या क्रियासमाधीस रुद्राभिषेक, सायंकाळी ४.०० वाजता स्वामीजींच्या प्रतिमेचे मिरवणूक काढण्यात येणार आहे तरी सर्व सदभक्तांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन गुरु आशीर्वाद घ्यावे असे आवाहन श्री गुरु बम्मलिंगेश्वर बृहन्मठ नागणसूर व रेवूर सदभक्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment