भीम प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, March 31, 2026

भीम प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 भीम प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील भीम प्रतिष्ठानतर्फे विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी  विविध क्षेत्रातील आठजणांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा बाबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
          या पुरस्काराचे वितरण सोहळा येत्या रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सोलापुरातील शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृह येथे मसाप पुण्याच्या मुख्य कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक यांच्या हस्ते व समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर ,जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत ,शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख नगरसेवक अमोल शिंदे ,ज्येष्ठ पत्रकार प्रशांत माने ,दिगंबर भगरे, रावजी सखाराम हायस्कूलचे प्राचार्य भारत केत, उद्योजक पदमचंद राका , राजेंद्र शहा (कासवा ),उदय वैद्य ,विठ्ठल शिवशरण, डॉ. शिवाजी पवार, धर्मेंद्र माने आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे बाबरे यांनी सांगितले. पुरस्काराचे हे 26 वे वर्ष आहे.
          या पत्रकार परिषदेस संयोजक अमित बाबरे , प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे, उपाध्यक्ष ॲड. विशाल मस्के , सचिव अकबर शेख ,कार्याध्यक्ष सिद्धांत बाबरे, , ॲड. स्वाती मस्के आदी उपस्थित होते.

यांचा होणार पुरस्काराने सन्मान

यावेळी भीमराव मोरे (सामाजिक), सीमा भंडारी (शैक्षणिक),बलभीम पारखे (कामगार), किरण बनसोडे (पत्रकारिता), रुक्मिणी लांबतुरे (गौरव पुरस्कार), प्रकाश शेळके( विशेष गौरव पुरस्कार), रेणुका हिरेमठ (सन्मानपत्र),प्राजक्ता सोलंकर (सन्मानपत्र) तर आदर्श पालक पुरस्कारासाठी कृष्णा व रत्नमाला माने यांची निवड करण्यात आली आहे. सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र ,शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages