२९ व्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत मोडनिंबचे नटरंग सांस्कृतिक कला केंद्र प्रथम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

२९ व्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत मोडनिंबचे नटरंग सांस्कृतिक कला केंद्र प्रथम

  २९ व्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत मोडनिंबचे नटरंग सांस्कृतिक कला केंद्र प्रथम



अकलूज (कटूसत्य वृत्त):- येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती आयोजित २९ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत मोडनिंब (जि. सोलापूर) येथील नटरंग सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टीने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला रु. ३ लाख रोख रक्कम व मानाचा चषक प्रदान करण्यात आला. पारितोषिक वितरण आमदार दिलीप सोपल यांच्या हस्ते झाले.

दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च या दोन दिवसांत पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यातील ११ संघांनी सहभाग घेतला. रंगतदार सादरीकरणांमुळे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

इतर क्रमांक

  • द्वितीय क्रमांक (विभागून) :

    • रुक्मिणी अर्चना जोत्स्ना वाईकर पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र, वेळे (ता. वाई, जि. सातारा)

    • प्रिया नगरकर न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, यवत-चौफुला (जि. पुणे)
      (प्रत्येकी रु. १ लाख व चषक)

  • तृतीय क्रमांक : वैशाली समसापूरकर, जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी (जि. पुणे) – रु. १ लाख व चषक

  • चतुर्थ क्रमांक : अलंकार सांस्कृतिक कला केंद्र, सुपा (जि. अहिल्यानगर)

  • पाचवा क्रमांक (विभागून) :

    • वैष्णवी कोल्हापूरकर, रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप-वाठार (जि. कोल्हापूर)

    • अपर्णा किर्ती नगरकर, लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी (जि. पुणे)

विशेष पारितोषिके

  • उत्कृष्ट मुजरा : नटरंग सांस्कृतिक कला केंद्र, मोडनिंब

  • उत्कृष्ट गायिका : राखी चौरे

  • उत्कृष्ट ढोलकी वादक : राहुल जावळेकर (रेणुका सांस्कृतिक कला केंद्र)

  • उत्कृष्ट हार्मोनियम वादक : अनिकेत साळुंखे (रेणुका सांस्कृतिक कला केंद्र)

स्पर्धेचे परीक्षक म्हणून माजी कुलगुरू मधुकर गायकवाड, समीक्षक डॉ. शशिकांत चौधरी व लेखक-पटकथाकार डॉ. चंद्रकांत जोशी यांनी काम पाहिले.

समारंभास समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील, स्पर्धा प्रमुख स्वरूपराणी मोहिते-पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व लावणी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या यशामुळे मोडनिंब परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages