शाळा, रस्ते व आरोग्य सुविधांवर अधिक काम करणार : मयुरी बागल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

शाळा, रस्ते व आरोग्य सुविधांवर अधिक काम करणार : मयुरी बागल

 शाळा, रस्ते व आरोग्य सुविधांवर अधिक काम करणार : मयुरी बागल

महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मितीसाठी विशेष भर




 पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद शाळा अधिक दर्जेदार व सर्व सुविधांनी सुसज्ज करण्यासह ग्रामीण भागातील रस्ते आणि आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषधे व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक जोमाने काम करणार असल्याचे जिल्हा परिषद वाखरी गटाच्या सदस्या मयुरी संतोष बागल यांनी सांगितले.

पंढरपूर श्रमिक पत्रकार संघ आयोजित चिंचणी येथील वार्तालाप कार्यक्रमात त्यांनी विविध विकासकामांबाबत आपले व्हिजन मांडले. यावेळी जगदंबा उद्योग समूहाचे संचालक संतोष बागल उपस्थित होते.

शैक्षणिक सुविधांवर भर

वाखरी गटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागल वस्ती ही शाळा जिल्ह्यात अव्वल ठरली असून इतर शाळाही त्या धर्तीवर विकसित करण्याचा मानस आहे. गटातील १२ शाळांना संरक्षण भिंत नसून १५ शाळांमध्ये दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडियन ऑइल कंपनीच्या सीएसआर निधीतून पटवर्धन कुरोली येथे ७५ लाख रुपयांची कामे हाती घेतली जाणार असून यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारली जाणार आहे.

पायाभूत सुविधा व आरोग्य सेवा

आव्हे-तरडगाव ग्रुप ग्रामपंचायतीतील तरडगाव येथे भगीरथ योजनेची लाईट व स्मशानभूमीचा प्रश्न प्रलंबित असून तो लवकर सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच पटवर्धन कुरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू व्हावे यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.

महिला सक्षमीकरण व रोजगार

महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार मेळावे आयोजित करून महिलांच्या हाताला काम मिळवून देण्याचा मानस आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी उद्योगधंद्याचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे नियोजन असल्याचे बागल यांनी स्पष्ट केले.

बाजीराव विहिरीचे सुशोभीकरण

वाखरी गटातील बाजीराव विहिरीचे सुशोभीकरण करून वारकऱ्यांसाठी माहिती केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. वारकरी संप्रदाय व परिसराची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या वेळी त्यांनी निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. ग्रामीण विकासास प्राधान्य देत सर्वसमावेशक काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages