राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सोलापूरची एंजल कोकरे प्रथम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सोलापूरची एंजल कोकरे प्रथम

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत सोलापूरची एंजल कोकरे प्रथम


मोडनिंब (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनासोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अरण येथील यशोदा गुरुकुलमध्ये दि. २८ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान १७ व्या मिनी सब-ज्युनियर गटाच्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. राज्यभरातून सुमारे ४०० खेळाडूंनी सहभाग घेतला.

एंजल कोकरेचा चमकदार विजय

रिकर्व्ह गटातील मुलींच्या स्पर्धेत सोलापूरच्या एंजल कोकरे हिने प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याचा मान उंचावला. मुलांच्या गटात अमरावतीच्या क्रीडा प्रबोधनीचा सार्थक तिहिले प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.

सांघिक निकाल

  • मुलांचे गट (सांघिक) : प्रथम – बुलढाणा, द्वितीय – पुणे, तृतीय – सातारा

  • मुलींचे गट (सांघिक) : प्रथम – पिंपरी चिंचवड, द्वितीय – नाशिक, तृतीय – बुलढाणा

  • मिक्स गट : प्रथम – नाशिक, द्वितीय – बुलढाणा, तृतीय – सोलापूर

स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी, यशोदा गुरुकुलचे शिक्षक व कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

या यशामुळे सोलापूरच्या क्रीडाक्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages