अंनिसचे इशारा: भोंदू बुवा-बाबांवर त्वरित कारवाई करा
या वेळी अंनिसचे सुधाकर काशीद, धर्मराज चवरे, बिरबल खांडेकर, श्रीधर उन्हाळे, अॅड. विनोद कांबळे, मोहन व्यवहारे, मनोहर गोडसे, रमेश दास, हनुमंत यादव, नागेश मते आणि संजय भोसले उपस्थित होते.
निवेदनात अंनिसने म्हटले आहे की, राज्यात अलीकडे उघडकीस येणाऱ्या भोंदू बुवा-बाबांच्या घटनांमुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दैवी शक्ती, चमत्कार, ज्योतिष किंवा अध्यात्माच्या नावाखाली अनेक ठिकाणी नागरिकांची आर्थिक फसवणूक, मानसिक छळ तसेच महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना समोर येत आहेत.
अशा प्रकारांमुळे समाजात अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असून गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळण्याचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे फलज्योतिष, दैवी शक्ती किंवा चमत्कारांच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलिस प्रशासनाने तातडीने तपास करून गुन्हे दाखल करावेत व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
तसेच समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी, असेही अंनिसच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment