रक्तदान करून एखाद्याचा जीव वाचवल्याची भावना मनाला समाधान देते- डॉ.बाळासाहेब निकम
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते अपघाती रुग्णाचे शस्त्रक्रिया दरम्यान गरजूंचे प्राण वाचून त्यांना नवीन आयुष्य मिळते रक्तदान करून आपण एखाद्याचा जीव वाचवल्याची भावना मनाला खूप सकारात्मक आणि मानसिक समाधान देत असल्याचे मत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.बाळासाहेब निकम यांनी व्यक्त केले.
ते नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय येथे महाविद्यालयाचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.रक्तदान शिबिराचे उद्घाटन ब्लड बँकेचे मेडिकल ऑफिसर डॉ.अजित गांधी, प्र.प्राचार्य डॉ.बाळासाहेब निकम, कार्यालयीन प्रमुख एच.टी.वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्र.प्रा.डॉ.बाळासाहेब निकम, प्रा.डॉ.डी.एस.थोरात,प्रा.हसन मोगल,प्रा. विजय धाईंजे,प्रा.डी.के.साठे, प्रा.बापूराव वाघमोडे, प्रा.डॉ.संभाजी बनसोडे,प्रा.अजित भोपळे,प्रा.सचिन पवार,प्रा.समाधान चव्हाण,प्रा.सचिन शेंडे,प्रा.शरयू बडवे,सूर्यकांत सालगुडे, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी,राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, यांनी रक्तदान करून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.स.म.शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूज येथील डॉक्टर व कर्मचारी यांनी रक्त संकलन करून घेतले. रक्तदान शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी ,प्रा.जगदीशचंद्र मुळीक, प्रा.उत्तम सावंत,तसेच प्रा.श्रीकांत पवार, प्रा डॉ. दत्तात्रेय शहाणे यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राध्यापिका तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment