जयसिंह मोहिते पाटील यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करेन- आ. दिलीप सोपल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 5, 2026

जयसिंह मोहिते पाटील यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करेन- आ. दिलीप सोपल

 जयसिंह मोहिते पाटील यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करेन- आ. दिलीप सोपल




अकलूज (कटूसत्य वृत्त):- लावणी कलावंतांना शासनाने अनुदान द्यावे अशी मागणी समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी केली होती. तर लावणीतील अनेक कलावंतांनी लावणीच्या योगदानाबद्दल जयसिंह मोहिते पाटील यांना पद्मश्री पुरस्कार द्यावा अशी मागणी केली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून या दोन्ही मागण्यासाठी मी शासन दरबारी प्रयत्न करेन असे आमदार दिलीपराव सोपल यांनी सांगितले.
     स्मृतिभवन शंकरनगर येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समितीच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत दुसऱ्या दिवशीच्या सादरीकरणा वेळी आमदार दिलीप सोपल बोलत होते.
         यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,पद्मश्री पुरस्कार प्राप्त कलावंत रघुवीर खेडकर, समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, स्पर्धा समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचे सह लावणी कलावंत व राज्यातून आलेले रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार दिलीपराव सोपल व पद्मश्री पुरस्कर्ते रघुवीर खेडकर यांचा सन्मान जयंती समितीच्या वतीने करण्यात आला.
जयसिंह मोहिते पाटील म्हणाले, कलावंत हा टाळ्यांचा भुकेला असतो. तो आत्मविश्वासाने व ताकतीने रंगमंचावर कला सादर करत असतो. रसिकांनीही त्यांना भरभरून दाद दिली पाहिजे.
     वैशाली कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र अंबप वठार कोल्हापूर यांनी मुजरा, गवळणी सह वैष्णवी डावाळे हिने काहो लावता जीवा हुर हुर, करू नका सख्या मला दूर आणि बसवा बुलेटवर मला दाजी या सादर केलेल्य लावणीला रसिकांनी दाद दिली.
       छाया पूजा श्रद्धा कोल्हापूरकर रेणुका सांस्कृतिक कला केंद्र अंबप वठार, राजनंदिनी सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी यवत चौफुला, नटरंग सांस्कृतिक कला केंद्र ग्रुप पार्टी मोडनिंब, प्रिया नगरकर न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्र यवत चौफुला, व रुक्मिणी अर्चना जोत्ना वाईकर पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र वेळे या पार्ट्यांचे रात्री उशिरापर्यंत सादरीकरण सुरू होते. सूत्रसंचालन राजकुमार पाटील, किशोर सूर्यवंशी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages