श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या वतीने साखर विक्री सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 5, 2026

श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या वतीने साखर विक्री सुरू

 श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याच्या वतीने साखर विक्री सुरू




वेणुनगर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या वतीने गुढीपाडवा सणानिमित्त सर्व सभासदांना व सन २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या सर्व ऊस पुरवठादार व कामगारांना २५ किलो पॅकींगमध्ये रुपये ३०/- प्रती किलो या दराप्रमाणे २५ किलो साखर प्रति सभासद, ऊसपुरवठादार व कामगार यांना याप्रमाणे साखर वाटपाचे धोरण आमदार अभिजित आबा पाटील चेअरमन यांचे मार्गदर्शनानुसार संचालक मंडळाने जाहीर केलेले आहे. त्याप्रमाणे बुधवार दि. ०४.०३.२०२६ पासून ते ३१.०३.२०२६ पर्यंत कारखाना साईटवर विठ्ठल कॅन्टीन शेजारी व पंढरपूर शहरामध्ये समृध्दी ट्रॅक्टर शोरुम, कॉलेज रोड, पंढरपूर येथे वाटप चालू राहील. तसेच मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस व सांगोला येथील ऊस पुरवठादार यांनी पंढरपूर येथील साखर वाटप केंद्रातून साखर कुपनवरती नमुद केलेल्या मुदतीमध्ये साखर घेवून जावी. तसेच माढा, करमाळा, बार्शी व परांडा गेटकेन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांसाठी ०१) माढा विभाग शेटफळ रोड, माढा, ०२) करमाळा व टेंभुर्णी विभाग : शिवसंकल्प गौरी प्लाझा, हॉटेल सुमित समोर, टेंभुर्णी, ०३) लऊळ विभाग मौजे लऊळ गट ऑफिस, पंढरपूर-कुर्डुवाडी रोडवर, लऊळ येथे साखर वाटप केंद्र चालु केलेले असून सदर केंद्रातील साखर वाटप दि. ०५.०३.२०२६ ते १८.०३.२०२६ पर्यंत साखर चालु राहिल.
वरील साखर वाटप केंद्र हे सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० व दुपारी १.३० ते सायं. ५.३० या वेळेमध्ये चालू राहतील. तसेच सध्या कारखान्याचा ऑफ सिझन चालू असल्यामुळे दर शनिवार, रविवार या दिवशी सुट्टी असल्याने व इतर जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या दिवशीही साखर दुकान बंद राहील,
पंढरपूर येथील साखर वाटपाच्या केंद्राचे उद्घाटन श्री विठ्ठल कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकर दाजी चव्हाण, श्री संत मुक्ताबाई मठाचे व्यवस्थापक शशिकांत पाटील, वास्तुशिल्प चे मालक व निशीगंधा बँकेचे चेअरमन आर. बी. जाधव, सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर काशिद, आनंदबापु पाटील, श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल व गजानन मेडिकलचे मालक गजाननबापू बागल यांचे शुभहस्ते करण्यात आले. तसेच कारखाना साईटवरील साखर वाटप केंद्राचे उद्घाटन संचालक प्रविण कोळेकर व सिध्देश्वर बंडगर, वर्क्स मॅनेजर यु. के. तावरे, चिफ केमिस्ट बी. आर. माने, लिगल ऑफिसर ओ.जे. अवधुत, चिफ अकौंटंट ओ. एस. शिंदे, शुगर सेल अधिकारी महेश घाडगे, हेड टाईम किपर एस. एस. जगताप व इतर अधिकारी यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे, सर्व सभासद, ऊसपुरवठादार, ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तरी सर्व सभासद यांना विनंती की, कुपनाशिवाय साखर मिळणार नाही व कुपनावरती नमुद केलेल्या मुदतीमध्ये साखर घेऊन जावे.
 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages