स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची अवैध दारुधंदयावर कारवाई - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 5, 2026

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची अवैध दारुधंदयावर कारवाई

 स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची अवैध दारुधंदयावर कारवाई





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मौजे मुळेगांव तांडा, गुळवंची तांडा, कामती, जवळा ता. सांगोला इत्यादी ठिकाणी दारुबंदी कायदयाखाली एकूण 07 केसेस करुन एकूण 7,800 लि. गुळमिश्रीत रसायन, 58 लिटर हा.भ. दारु, 25 लिटर शिंदी, 141 देशी दारुच्या बाटल्या असा एकूण 3,87,020/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन कारवाई पोलीस अधीक्षक  सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना सोलापूर ग्रामीण जिल्हयामध्ये होळी व धुलीवंदनच्या पाश्र्वभूमीवर अवैध दारुनिर्मिती व दारुविक्री होणाऱ्या ठिकाणी छापे मारुन अवैध दारुच्या भट्टया नष्टकरुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना अवैध दारुधंदयावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणे सपोनि भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुजावर यांचे पथक मौजे मुळेगांव तांडा ता. दक्षिण सोलापूर व मौजे गुळवंची ता. उत्तर सोलापूर* येथील हातभट्टी दारुनिर्मितीच्या 02 ठिकाणी छापेमारुन 39 बॅरेल मधील एकूण 7,800 लिटर गुळमिश्रीत रसायन जागीच नष्टकरुन एकूण 03 आरोपींविरुध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे 02 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 
तसेच कामती पोलीस ठाणे हद्दीत एकूण 02 केसेस करुन 53 लिटर हातभट्टी दारु, 25 लिटर शिंदी, तसेच मौजे जवळा ता. सांगोला येथे एकूण 03 केसेस करुन एकूण 141 देशी दारुच्या बाटल्या व 05 लिटर हातभट्टी दारु जप्त करुन कारवाई करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने अवैध दारुधंदयावरील कारवाईमध्ये एकूण 07 केसेस करुन 7,800 लिटर गुळमिश्रीत रसायन, 58 लिटर हातभट्टी दारु, 25 लिटर शिंदी व 141 देशी दारुच्या बाटल्या असा एकूण 3,87,020 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 11 आरोपीतांविरुध्द दारुबंदी कायदयाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप सोनटक्के, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांचे पथकाने कामगिरी बजावली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages