महापालिका आयुक्तांचा शहरात झंझावाती दौरा
नालेसफाई, पाणीपुरवठा आणि शैक्षणिक दर्जाची प्रत्यक्ष पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, ड्रेनेज लाईन आणि नागरी सुविधांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी आज विविध प्रभागांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन तांत्रिक सूचना दिल्या तसेच नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच समस्या जाणून घेतल्या
दौरा क्रं १. प्रभाग क्र. २३: ड्रेनेज लाईन व पाणीपुरवठा सुधारणा
जुळे सोलापूर येथील म्हाडा कॉलनी ते पनाश अपार्टमेंट दरम्यान टाकण्यात येणाऱ्या ड्रेनेज पाईपलाईनची आयुक्तांनी पाहणी केली. पाईपलाईन सलग न टाकता ठराविक अंतरावर 'मॅनहोल्स' (चेंबर) तयार करण्याचे आदेश दिले.
प्रकल्पाच्या जागेतील अनधिकृत नर्सरींना तात्काळ नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले. नगरसेविका श्रीमती वनिता पाटील यांनी उपस्थित केलेल्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर रात्री ९ ते १२ ही पाणी सोडण्याची सुधारित वेळ करू असे आयुक्तांनी सांगितले. . या दौऱ्यावेळी उपमहापौर श्रीमती देवकर यांच्या विनंतीनुसार येथे देशी वृक्ष लागवडीच्या सूचनाही देण्यात आल्या. . या दौऱ्यावेळी उपमहापौर सौ.ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेविका श्रीमती वनिता पाटील, विभागीय अधिकारी श्री. तळखडे, नगर अभियंता विभाग प्रमुख श्रीमती सरिता आकुलवार व इतर अभियंता उपस्थित होते.
दौरा क्रं २. भारतरत्न इंदिरा नगर: नाला पुनर्वसन व शालेय पाहणी
इंदिरा नगर ते एस.टी. बस स्थानक क्र. २ पर्यंतच्या नाला सफाईचा आढावा घेताना आयुक्तांनी स्वच्छतेबाबत कडक सूचना दिल्या. व जवळील मनपा मराठी शाळा क्र. ५ ला भेट देऊन आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांची 'छोटी चाचणी' (Test) घेऊन शैक्षणिक दर्जाची पडताळणी केली. . या दौऱ्यावेळी नगर अभियंता विभाग प्रमुख श्रीमती -सरिता आकुलवार,नगरसेविका- श्रीमती राजश्री धोंडमनी, मुख्याध्यापक -श्री संदीप गोळावे विभागीय अधिकारी - श्री. गायधनकर व इतर अभियंता उपस्थित होते.
दौरा क्रं ३. आदिला नदी येथील वैशाली हाईट्स परिसरातील नाल्याचे : खोलीकरण व दुरुस्ती
आदिला नदी येथील नाल्याच्या खोलीकरणाची पाहणी करताना आयुक्तांनी स्पष्ट केले की, हे काम केवळ 'सोमपा'च्या ले-आउटनुसारच व्हावे. कामात अडथळा आणणाऱ्यांना नोटीस देण्याचे व रहदारीसाठी १ मीटर व्यासाची पाईप टाकण्याचे आदेश दिले. खोदकामातील माती व दगड तात्काळ हटवण्याच्या सूचना कंत्राटदाराला देण्यात आल्या. या दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे, नगरसेविका – श्रीमती. मंदाकिनी तोडकर, सभागृह नेते श्री. नरेंद्र काळे ,विभागीय अधिकारी - श्रीमती सुनिता हिबारे, सहाय्यक अभियंता शाम कन्ना व इतर अभियंता उपस्थित होते.
दौरा क्रं ४. कारंबा व पूना नाका: नालेसफाईला प्राधान्य
कारंबा नाका आणि शेळगी नाल्याच्या पाहणी दरम्यान आयुक्तांनी नाल्यातील गाळ व झाडे-झुडपे तातडीने काढण्याचे आदेश दिले. पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी नाल्याचा गोलाकार भाग कपात करून तो सरळ करण्याच्या सूचना नगर अभियंता श्रीमती सरिता आकुलवार यांना दिल्या. या दौऱ्यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. संदीप कारंजे, नगरसेवक श्री. गौतम कसबे, विभागीय अधिकारी – सरकारजी , नगर अभियंता विभाग प्रमुख श्रीमती सरिता आकुलवार

No comments:
Post a Comment