विधानपरिषदेसाठी वीरशैव लिंगायत युवा चेहरा म्हणून माझ्या नावाचा विचार व्हावा- सुदीप चाकोते - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, February 23, 2026

विधानपरिषदेसाठी वीरशैव लिंगायत युवा चेहरा म्हणून माझ्या नावाचा विचार व्हावा- सुदीप चाकोते

 विधानपरिषदेसाठी वीरशैव लिंगायत युवा चेहरा म्हणून माझ्या नावाचा विचार व्हावा- सुदीप चाकोते






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिल्ली येथे मल्लिकार्जुन खर्गे साहेबांची भेट घेऊन विधानपरिषदेसाठी मी इच्छुक असल्याची अधिकृत विनंती केली. यावेळी पक्ष संघटन, आगामी राजकीय दिशा आणि युवकांच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा झाली.
पक्ष अत्यंत अडचणीच्या काळातून जात असताना गेल्या २५ वर्षांपासून मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य प्रामाणिकपणे केले आहे.
युथ काँग्रेसचा अध्यक्ष असताना सोलापूर जिल्ह्यात युवकांची मोठी फळी उभी केली. संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच दिल्लीमध्येही आंदोलनं केली; पोलिसी कारवाईला सामोरं जात अनेक गुन्हे अंगावर घेतले, तरीही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो.
 काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या माध्यमातून युवकांना काँग्रेसची विचारधारा प्रशिक्षणाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवत आहोत. प्रतिकूल परिस्थितीतही पक्षाशी तत्वनिष्ठ राहून काँग्रेस पुन्हा बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
मी लिंगायत समाजाचा असून महाराष्ट्रात सव्वा कोटी ते दीड कोटी लिंगायत बांधव आहेत—विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. सध्या मी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
जर विधानपरिषदेत युवक वीरशैव लिंगायत चेहरा म्हणून मला संधी मिळाली, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला एका छत्राखाली संघटित करून २०२९ मध्ये पक्षाला निश्चितच मोठा राजकीय लाभ मिळवून देता येईल, असा विश्वास आहे. असे सुदीप चाकोते यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages