Hot Posts

6/recent/ticker-posts

राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात

राजराजेश्वरी प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात



सोलापूर(कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार , ज्येष्ठ शिक्षक बजरंग शिरसट, सांस्कृतीक विभाग प्रमुख वैशाली गुजर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इयत्ता पाचवी ब वर्गातील श्रावणी सोन्नद व नंदिनी कुंभार यांनी पोवाडा सादर केले.त्यानंतर इयत्ता सहावीतील विद्यार्थिनींनी 'जय जय शिवराय' या गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.लक्ष्मी अंणकल व सिद्धाराम पारे या विद्यार्थ्यांनी व सहशिक्षक एम.एस. बिराजदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितले.यावेळी शाळेतील शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments