मानेगाव गटात भाजपचा विजय निश्चित- पृथ्वीराज सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 3, 2026

मानेगाव गटात भाजपचा विजय निश्चित- पृथ्वीराज सावंत

 मानेगाव गटात भाजपचा विजय निश्चित- पृथ्वीराज सावंत



माजी आमदार अँड धनाजीराव साठे व गटाचा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा

माढा (कटूसत्य वृत्त):- मानेगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवारांना माढ्यातील माजी आमदार अँड. धनाजीराव साठे व त्यांच्या गटाने जाहीर पाठिंबा दिल्याने विजयाचा मार्ग अधिक सुकर झाला असून, गेल्यावेळी परस्परविरोधात असलेले सर्व नेते आज विकासाच्या मुद्यावर एकत्र आले आहेत.असे प्रतिपादन भाजप नेते  पृथ्वीराज सावंत यांनी केले. 

                  साठे गटाच्या पाठिंब्यामुळे मानेगाव गटातील जनतेचा विश्वास भाजपवर अधिक दृढ झाला असून, ही निवडणूक विकास विरुद्ध विरोधकांची राजकीय दिशाहीनता अशी ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मानेगाव जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवारांना माजी आमदार अँड. धनाजीराव साठे यांच्या गटाने जाहीर पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत.
 गेल्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले दादासाहेब साठे, पृथ्वीराज सावंत आणि रणजितसिंह शिंदे हे नेते आता एकत्र आले असून, या एकजुटीमुळे भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. साठे गटाची मानेगाव गटात निर्णायक ताकद मानली जाते.
या निवडणुकीत दादासाहेब साठे हे मोठ्या भावाची भूमिका बजावत प्रचाराची धुरा सांभाळणार असल्याचे पृथ्वीराज सावंत यांनी सांगितले. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यकर्त्यांच्या मजबूत संघटनेचा लाभ भाजपच्या उमेदवारांना होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते दादासाहेब साठे यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याने मानेगाव गटातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. विकास, स्थैर्य आणि समन्वयाच्या राजकारणासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी आमदार अँड. धनाजीराव साठे, दादासाहेब साठे, नगराध्यक्षा अँड. मीनल साठे, ऋतुराज सावंत, कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ तसेच भाजप व साठे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages