अक्कलकोटमध्ये शिवरायांच्या पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना व पाळणा कार्यक्रम संपन्न
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- जय भवानी...! जय शिवराय...!! च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मंगलमय वातावरणात व मोठ्या दिमाखदार आणि उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची प्राणप्रतिष्ठापना व शिवरायांचा पाळणा कार्यक्रम गुरुवारी २ हजार महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जय भवानी...! जय शिवराय...!! च्या घोषणानी आसमंत दुमदुमला होता. आकर्षक शामियाना मंडप, विद्युत रोषणाई, नयनरम्य फटाक्यांची आतिषबाजीने परिसर फुलून गेलेला होता.
दरम्यान गुरुवारी सकाळी ११ वा. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले, युवक मंडळाचे मार्गदर्शक सुरेशचंद्र सूर्यवंशी, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, उत्सव अध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष योगेश पवार व पदाधिकारी यांच्या हस्ते अन्नछत्र मंडळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीने जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात मूर्ती स्थापन करण्यात आले. या प्रसंगी पुरोहित सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने विधीवत पूजन करण्यात आले.
सायंकाळी ६ वा. प्रतिष्ठापना व पाळणा कार्यक्रम जुना राजवाडा समोरील शामियाना मंडपात छत्रपती शिवरायांच्या सिंहासनारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थाच्या संस्थापिका अध्यक्षा व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या विश्वस्ता- अलकाताई जनमेजयराजे भोसले, सचिवा- अर्पिताराजे अमोलराजे भोसले, नगराध्यक्षा मैंदर्गी- अंजली बाजारमठ, माजी नगराध्यक्षा- अनिता खोबरे, हिरकणी महिला बहु. संस्था सदस्या- सरोजनी मोरे, उपाध्यक्षा- रत्नमाला मचाले, जि.प. सदस्या- शिवानी स्वामी, नगरसेविका- सोनाली शिंदे, प्रमिला देशमुख, पंचायत समिती सदस्या- आशा इंगळे, नगरसेविका- अपर्णा सिद्धे, कु. तेजस्विनीराजे अमोलराजे भोसले, कु. स्वामीनीराजे अमोलराजे भोसले, नगरसेविका- भागुबाई कुंभार, नगरसेविका- सुनंदा स्वामी, नगरसेविका- रेणुका राठोड, नगरसेविका- शैला स्वामी, कस्तुरा चौगुले, अमृता शिंदे, सरिता कुर्ले, स्नेहा खवळे, जहीराबी शेख, अल्फिया कोरबू, नगरसेविका मैंदर्गी सपना मोरे मल्लम्मा पसारे, संध्याराणी हिप्परगी, सौ. शहा, लक्ष्मी अचलेर समस्त सदस्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या स्मिता कदम, पल्लवी कदम, संगिता भोसले, स्वाती निकम, उज्वला भोसले, कविता वाकडे, कविता भोसले, रूपा पवार, क्रांती वाकडे, छाया पवार, जयश्री माने, प्रांजली घाटगे, स्वप्ना माने, तृप्ती बाबर, आशा कदम, ज्योती कदम, कल्पना मोरे, धनश्री पाटील, श्रुती मोरे, दिव्या मोरे, अनिता साळुंखे, ज्योती शिंदे, गौरी शिंदे, उज्वला शिंदे, दिपाली हत्ते, सिमा फुटाणे, सुवर्णा घाटगे, लता मोरे, कोमल क्षीरसागर, सुवर्णा साखरे, सुजाता भीमपूरे, सूनयना मोरे, संगीता राठोड, रेखा पाटील, प्रांजली घाडगे, सुवर्णा कदम यांच्यासह तालुक्यातील वळसंग, शिरवळ, कुरनूर, वागदरी, काळेगाव, चुंगी येथील महिला मंडळासह सखी ग्रुप, वीरशैव महिला मंडळ, जिजाऊ सखी मंच यांच्यासह शहरातील विविध महिला मंडळ भगिनींच्या हस्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी महिला मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी मुख्य पुरोहित अप्पू पुजारी व सोमकांत कुलकर्णी यांच्या मंत्र पठणाने विधीवत पूजन करण्यात आले.
यावेळी सागर हिप्परगी, सोपानराव गोंडाळ, कु. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले, रामचंद्रराव घाटगे, गणेश भोसले, मल्लिनाथ करपे, प्रा.भीमराव साठे, प्रा. सायबण्णा जाधव, प्रा.मनोज जगताप, शिवराज स्वामी, किरण जाधव, अनिल टोणपे, सिद्धेश्वर जाधव, विराज माणिकशेट्टी, संजय बडवे, बालाजी जाधव, श्रीशैल कुंभार, दिपक जरीपटके, दत्तात्रय बाबर, रुद्रय्या स्वामी, सातय्या स्वामी, सुनील खवळे, सायबण्णा हरवाळकर, अॅड. अनिल पाटील, पप्पू कोल्हे, चेतन जाधव, संतोष जाधव, सुनील पवार, सागर गोंडाळ, गोविंदराव शिंदे, रमेश शिंदे, महादेव बिराजदार, अश्पाकभाई कझी, किरण पाटील, बाळासाहेब घाटगे, रवी कदम, शिवा मंगरुळे, लक्ष्मण विभूते, चंद्रकांत कुंभार, ज्ञानेश्वर भोसले, संतोष माने, समर्थ घाटगे, शरद भोसले, सुराज्य घाडगे, किरण साठे, युवराज सोनटक्के, महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, शुभम चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह अमोलराजे भोसले लेझीम संघाचे सदस्य व युवक कार्यकर्ते बहुसंख्याने उपस्थित होते. यावेळी तीन चिमुकल्या कलाकारांनी नृत्य सदर केले व नागपूर येथील कलाकारांनी शिवगाथा गायली. या प्रसंगी कलाकारांना जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या कडून बक्षीस देण्यात आले. दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या शिवस्मारक, शिवसृष्टी, श्री स्वामी समर्थ वाटिका, आश्रयदाते कक्षातील छत्रपतींच्या पुतळ्यांचे पूजन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.प्रकाश सुरवसे यांनी केले. श्री कमलाराजे चौकातील शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठापना व पूजन आधारस्तंभ अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवजन्मोत्सव अध्यक्ष – आकाश शिंदे, उपाध्यक्ष – योगेश पवार, सचिव- सुमित घाटगे, श्रीधर गुरव, खजिनदार – शितल फुटाणे-जाधव तर कार्याध्यक्ष –विशाल कलबुर्गी, राजू पवार, फहिम पिरजादे, आकाश सूर्यवंशी मिरवणूक प्रमुख- संतोष भोसले, बाळासाहेब पोळ, प्रवीण घाडगे, निखील पाटील, गोटू माने, सनी सोनटक्के, सागर सोमवंशी लेझीम संघ व्यवस्थापक- वैभव मोरे, योगेश पवार, प्रथमेश पवार, मंगेश सूर्यवंशी, अमित घाटगे शिवजयंती स्टेज व मिरवणूक ट्रॉली सजावट प्रमुख- राहुल मोरे, वैभव कामनुरकर, समर्थ घाटगे, अनंत क्षीरसागर व्यवस्थापक- मनोज निकम, राजाभाऊ नवले, नितीन शिंदे, सौरभ मोरे, रोहित खोबरे, संजय गोंडाळ सत्कार प्रमुख- अशिष हुंबे, प्रशांत कडबगावकर प्रसिद्धी प्रमुख- प्रशांत भगरे, प्रवीण देशमुख, सोमशेखर जमशेट्टी, शंभूलिंग अकतनाळ, मिडिया प्रमुख अतिश पवार यांच्यासह आदिजन उपस्थित होते.
चौकट :
२१ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक :
शनिवारी दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार असल्याचे उत्सव अध्यक्ष आकाश शिंदे यांनी सांगितले.
चौकट :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे मार्गदर्शक सुरेशचंद्र सूर्यवंशी, शामराव मोरे, बाबासाहेब निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संयोजक अमोलराजे भोसले मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजन्मोत्सव – २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
.png)
0 Comments