Hot Posts

6/recent/ticker-posts

पंचायत समितीत भाजपची खिलारेंना गटनेतेपदाची संधी

 पंचायत समितीत भाजपची खिलारेंना गटनेतेपदाची संधी




मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ तालुका पंचायत समितीच्या भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी संजीव माणिक खिलारे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील यांनी ही घोषणा केली.

कृषी उत्पन्न बाजार समिती, मोहोळ येथे आयोजित बैठकीत नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पंचायत समिती सभागृहातील गटनेता निवडीचे सर्वाधिकार राजन पाटील यांना देण्यात आले. त्यानंतर त्यांनी संजीव खिलारे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

संजीव खिलारे हे पक्षातील चळवळीतील अभ्यासू व लढाऊ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांना गटनेतेपदाची संधी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. समाजातील विविध स्तरातून त्यांच्या निवडीचे स्वागत होत असून, आगामी काळात पंचायत समितीमध्ये पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश चवरे, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, मोहोळ शहर व तालुका पूर्व अध्यक्ष सतीश (आप्पा) काळे, मोहोळ दक्षिण तालुका अध्यक्ष रमेश माने, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष मुजीब मुजावर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अंकुश (भैय्या) आवताडे, मोहोळ नगरपरिषद उपनगराध्यक्ष दत्ता खवळे, नगरसेवक सुशील (भैय्या) क्षीरसागर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य लखन शिंदे, बालाजी नरुटे तसेच पंचायत समिती सदस्य अस्लम चौधरी, सौ. उल्का पाटील, सौ. पार्वती गावडे, सौ. निलम मसलकर, सौ. कोमल आवताडे, सौ. अमिरिका कापसे, अक्षय खताळ आदी उपस्थित होते.

तसेच माजी नगरसेवक संतोष सुरवसे, अण्णा फडतरे, मंगेश गुंड यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संजीव खिलारे यांनी निवडीनंतर बोलताना, “पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रयत्नशील राहीन. मोहोळ तालुक्याच्या विकासासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवू,” अशी ग्वाही दिली.

मोहोळ पंचायत समितीत भाजपच्या संघटनात्मक बळकटीसाठी ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments