Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवतेज मंडळाच्या शिवजन्मोत्सवाला सुरुवात

 शिवतेज मंडळाच्या शिवजन्मोत्सवाला सुरुवात




 रक्तदान शिबिरात ३९ जणांचे रक्तदान

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजन्मोत्सवाला उत्साहात सुरुवात करण्यात आली. याच वेळी आयोजित रक्तदान शिबिराचेही मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषद नूतन सदस्य श्रीमती विमल तानाजी खताळ, मोहोळ पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक बाजीराव पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य जयसिंग नाना अवताडे, अशोक अवताडे, सावळेश्वरचे सरपंच सखाराम साठेसर, माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे, कामती जिल्हा परिषद सदस्य अंकुश भैय्या अवताडे, अक्षय खताळ, प्रदीप आमले, लांबोटीच्या माजी सरपंच लक्ष्मी बंडू चट्टे पाटील, उपसरपंच नितीन चंदनशिवे, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जाधव, नामदेव गोफने, सिद्धेश्वर सुळ गुरुजी, समाधान व्यवहारे, विलास शिंदे, उत्सव समिती अध्यक्ष अविराज चट्टे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, महेश शिंदे, आनंद व्यवहारे, ग्रामपंचायत सदस्य मोहन दाजी खताळ, माजी सरपंच पप्पू कदम, संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उद्घाटनानंतर पार पडलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ३९ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

शिवजन्मोत्सवानिमित्त पुढील सहा दिवस विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रक्तदान शिबिरे, विद्यार्थ्यांना भाषणासाठी वह्या वाटप, व्याख्यानमाला तसेच कीर्तन कार्यक्रमांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर जाधव यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments