धकाधकीच्या जीवनात पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी - डॉ.अश्विनी पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

धकाधकीच्या जीवनात पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी - डॉ.अश्विनी पाटील

धकाधकीच्या जीवनात पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी - डॉ.अश्विनी पाटील


मराठी पत्रकार संघाच्या वतीने मोफत हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांनी आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, कामाचा ताण असला तरी योग्य आहार आणि व्यायाम यामुळे आरोग्य सुरक्षित ठेवता येते असे प्रतिपादन पोलीस आयुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी केले
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर आणि एसीएस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे चौक येथील एसीएस हॉस्पिटल येथे मोफत हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, ज्येष्ठ संपादक राकेश टोळ्ये, व्यंकटेश पटवारी, प्रशांत माने, संजय पाठक, पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत आणि श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाल्या पत्रकारांच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कामाचा ताण असतानाही आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल योग्य आहार आणि व्यायामाची गरज आहे. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. ACS हॉस्पिटलने सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.  यावेळी राकेश टोळ्ये, मनीष केत, डॉ. सिद्धांत गांधी यांनीही मार्गदर्शन केले.
Acs हॉस्पिटलचे नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सिद्धांत गांधी, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. प्रमोद पवार, डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. स्नेहल पवार आणि डॉ. ऋचा गांधी यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले.
या शिबिरात प्रामुख्याने बीपी, शुगर, ईसीजी, २डी इको, स्ट्रेस टेस्ट आणि स्ट्रेस इको या तपासण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिरास पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक आदेप्पा यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौरभ वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. प्रमोद पवार यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages