चक्क पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ही कॉपी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

चक्क पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ही कॉपी

 चक्क पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ही कॉपी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील गेनसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हायस्कूल मध्ये काल रविवारी दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा दरम्यान उघडपणे कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.परीक्षा सुरू असताना शिपाई आणि काही शिक्षक वर्गात शिरून आपापल्या ओळखीच्या विद्यार्थ्यांना उत्तरे पुरवत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.दरम्यान केंद्र संचालक सूर्यकांत माने यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवलेल्या खुलाशात कॉपी सारखा कोणताही अनुचित अनुचित प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे.
 व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून संबंधित गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख व शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखी अहवाल सादर करण्यास सांगितले असून यावरून पुढील कारवाई केली जाईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी कादर शेक यांनी दिले आहे.या गंभीर प्रकाराची तत्काळ चौकशी करून संबंधित परीक्षा रद्द करण्यात यावी, दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच केंद्रप्रमुख व संबंधित शिक्षकांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages