सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, February 24, 2026

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार वितरण समारंभ संपन्न


अकलूज (कटूसत्य वृत्त):- शंकरनगर (ता.माळशिरस) येथे श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्ट व मराठी साहित्य परिषद शाखा अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कार वितरण समारंभात डॉ. जयसिंगराव पवार,डॉ.सदानंद देशमुख व कवी नारायण सुमंत यांना माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदन करण्यात आले.
              शंकरनगर येथील उदय सभागृहात संपन्न झालेल्या या साहित्य पुरस्कार वितरणाप्रसंगी अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील,आ.रणजितसिंह मोहिते-पाटील,सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील,स्वरुपाराणी मोहिते- पाटील,नगराध्यक्षा रेश्मा अडगळे, विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, विश्वस्त नितीन खराडे,चंद्रकांत कुंभार,डॉ.विश्वनाथ आवाड,श्रीकांत राऊत,राजेंद्र काकडे,शहेनाज शेख,वसुंधरा देवडीकर यांच्यासह साहित्यप्रेमी रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.
                प्रारंभी प्रास्ताविकात स्वरुपाराणी मोहिते-पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करुन पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे परिचय करुन देत अकलुज कला,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहे. साहित्य क्षेत्रात बिजारोपणासाठी साहित्य पुरस्कार प्रदानाच्या उद्देश असुन गेली ४ वर्षापासून साहित्त्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या साहित्यिकांचा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहित्य पुरस्कारा देऊन गौरविण्यात येत असल्याचे सांगितले.
              याप्रसंगी पुरस्कार प्राप्त नारायण सुमंत,डॉ.सदानंद देशमुख व डॉ.जयसिंगराव पवार यांच्या वतीने पुरस्कार स्विकारणा-या आसावरी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनायक सुर्यवंशी यांनी केले तर आभार रोहित देशमुख यांनी मानले.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages