आठ वर्षांनंतर महापालिकेला मिळणार स्थायी समिती चेअरमन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

आठ वर्षांनंतर महापालिकेला मिळणार स्थायी समिती चेअरमन

 आठ वर्षांनंतर महापालिकेला मिळणार स्थायी समिती चेअरमन




सोलापूर (कटूसत्य वृत्त): सोलापूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या चेअरमनपदाची निवड येत्या ६ मार्च रोजी होणार असून तब्बल आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महापालिकेला स्थायी समितीचा चेअरमन मिळणार आहे.

२० फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीच्या एकूण १६ सदस्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये Bharatiya Janata Party चे १४ सदस्य, तर ऑल इंडिया  मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन आणि शिव सेने यांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. सत्ताधारी भाजपच्या १४ सदस्यांपैकी एकाला चेअरमनपदाची संधी मिळणार आहे.

भाजपकडून अविनाश पाटील, सतीश सिरसीला, रंजीता चाकोते, गणेश वानकर, भारतसिंग बडूरवाले, सत्यनारायण गुर्रम, अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, जयकुमार माने, शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, राजकुमार पाटील, अमर पुदाले आदींची निवड झाली आहे. एमआयएमचे अझहर हुंडेकरी व शिवसेनेचे अमोल शिंदे हेही समितीवर आहेत.

महापौर व सभागृहनेता निवडीत ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले, तर उपमहापौरपद मराठा समाजाला देण्यात आले होते. आता स्थायी समितीच्या चेअरमनपदासाठी लिंगायत समाजाचा विचार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास रंजीता चाकोते किंवा अविनाश पाटील यांची वर्णी लागू शकते. शहर उत्तर भागातील नगरसेवकाला संधी देण्याचा विचार झाल्यास राजकुमार पाटील, अमर पुदाले, गणेश वानकर आदींची नावे चर्चेत आहेत. जयकुमार माने यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.

२०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याची महत्त्वाची जबाबदारी स्थायी समितीवर असणार आहे. मागील चार वर्षे महापालिकेत प्रशासक राजवट असल्याने प्रशासनानेच बजेट सादर केले होते. यावेळी भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने सक्षम आणि विकासाभिमुख बजेट सादर करण्याचे आव्हान समितीपुढे असेल.

◼ ४ मार्चला नामनिर्देशन

विभागीय आयुक्तांनी निवडीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ४ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जातील. ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी गणेश निन्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक होऊन चेअरमनची निवड होईल.

◼ बिनविरोध निवडीची शक्यता

१६ पैकी १४ सदस्य भाजपचे असल्याने चेअरमनपदाची निवड बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी महापौर व उपमहापौर पदांची निवडही बिनविरोध झाली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages