Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरमध्ये प्रथमच TEDx Talk नवविचारांचा जागतिक मंच

 सोलापूरमध्ये प्रथमच TEDx Talk नवविचारांचा जागतिक मंच




एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अभियांत्रिकी शिक्षणाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव (सोलापूर) येथे पहिल्यांदाच TEDxSinhgad COE 2026 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या TEDx Talk चे आयोजन करण्यात आले असल्याचे सिंहगडचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी सांगितले.

हा प्रेरणादायी कार्यक्रम शनिवार, 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार असून सोलापूर शहरात प्रथमच TEDx संकल्पनेअंतर्गत असा भव्य उपक्रम राबविण्यात येत आहे‌. विद्यार्थ्यांसाठी विचारविश्व उलगडणारा प्रेरणादायी मंच राहणार आहे‌.

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या TED (Technology, Entertainment, Design) या संकल्पनेअंतर्गत आयोजित या कार्यक्रमाची यंदाची संकल्पना “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) युगातील शिक्षण – विचार व कौशल्यांची जडणघडण” अशी आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नवविचार, सर्जनशीलता, तंत्रज्ञानाची जाण आणि भविष्याभिमुख दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

या TEDx Talk मध्ये प्रभावशाली वक्ते आणि तज्ज्ञ मान्यवर विविध विषयांवर आपले विचार मांडणार आहेत. यामध्ये कॉर्पोरेट ट्रेनर डॉ. अर्शद सय्यद, इन्फ्लुएंसर मंदार पाडवळ, लेखक अतुल कहाते,  उद्योजिका ऐश्वर्या यादव आणि उद्योजक मुदस्सर अली रंगरेज यांचा समावेश आहे. शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि सामाजिक जबाबदारी या विषयांवर प्रेरणादायी संवाद होणार आहे.

दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात विविध सत्रे, सांस्कृतिक सादरीकरणे, ओपन पॅनल डिस्कशन तसेच विद्यार्थ्यांशी थेट संवाद यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सर्जनशील विचारसरणी आणि जागतिक व्यासपीठाशी जोडण्याची संधी मिळणार असल्याने हा उपक्रम संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीतील एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

हा कार्यक्रम विद्यार्थी, कर्मचारी, व्यावसायिक व सर्वांसाठी सशुल्क खुला असणार आहे. यामध्ये पास, प्रमाणपत्र, ओळखपत्र व जेवणाची सोय करण्यात आली आहे. इच्छुकांनी सहभागासाठी अधिक माहितीसाठी डॉ .प्रदीप तपकिरे‌ (मो. 9767890517), अर्शद सय्यद व जीवनकुमार तोळणुरे (मो. 9822342644) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments