रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूरतर्फे चित्रकला स्पर्धा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूर यांच्या वतीने दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी रोटरी नॉर्थ राधाकिसन फोमरा मुखबधिर विद्यालय, सोलापूर येथे चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शाळेतील ५० मुखबधिर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कल्पकतेचा व कलागुणांचा प्रभावी आविष्कार सादर केला.
या कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अध्यक्ष रोट्रॅ. बसवराज कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रोट्रॅ. निखिल ताटे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना योग्य वातावरण, साहित्य व मार्गदर्शन मिळावे यासाठी त्यांनी काटेकोर नियोजन केले.
कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे मॅडम व सहशिक्षिका रेणुका पसपुले मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत स्पर्धेत मनमोकळेपणाने सहभागी होण्यासाठी प्रेरित केले.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कलाकार व लेखक ऋत्विज चव्हाण उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या चित्रांचे बारकाईने निरीक्षण करून त्यांच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले. “भाषेच्या मर्यादा असूनही कला ही भावना व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे,” असे मत व्यक्त करत त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमामुळे मुखबधिर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली असून त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी, या उद्देशाने रोटरॅक्ट क्लब ऑफ सामर्थ्य सोलापूर राबवत असलेले असे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
.png)
0 Comments