चोपडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार निवडणूक रिंगणात
चोपडी जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध- चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाकडून भाजपचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत हे चोपडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चोपडी जिल्हा परिषद गटातून पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांचा चेतनसिंह केदार सावंत यांच्या उमेदवारीला मोठा पाठिंबा असून कोणत्याही परिस्थितीत चेतनसिंह केदार सावंत यांना निवडून आणू असा विश्वास चोपडी जिल्हा परिषद गटातील बांधवांकडून व्यक्त होत आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यापासून वरिष्ठापर्यंत सर्वांच्या विकासासाठी योजना राबवणारे सरकार म्हणून भाजप -शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या सरकारकडे पाहिले जाते.
चोपडी जिल्हा परिषद गटातील चोपडी येथे प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी व कार्यकर्त्यांच्या भेटी प्रसंगी चेतनसिंह केदार सावंत यांनी सरकारचे कार्य व चोपडी जिल्हा परिषद गटासाठी माझी भूमिका ही विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील. चोपडी गावच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू व गावचे महत्वाचे प्रश्न व समस्या मार्गी लावू त्यासाठी सर्वांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सहकार्य करून मोठ्या बहुमताने विजयी करावे असे आवाहन चोपडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार भाजपचे जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले.
यावेळी सेवानिवृत्त सुभेदार अमोल बाबर यांनी उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचे निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने स्वागत करीत चोपडी गावासाठी आपण विकास कामे अधिकाधिक मार्गी लावावीत अशी मागणी केली. या मागणीस चेतनसिंह केदार सावंत यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करीत तुमच्या गावच्या सेवेसाठी आपण कायमस्वरूपी सहकार्य करू असे अभिवचन दिले.
यावेळी उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांनी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले तसेच ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव व मित्रपरिवार,माजी आमदार शहाजीबापू पाटील प्रेमी कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेचे व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवावर्ग, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
0 Comments