भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 22, 2026

भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन

 भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन







▪️ अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची धावपळ
▪️ जिल्हा परिषदसाठी ९० अर्ज तर पंचायत समितीसाठी १०१ अर्ज प्राप्त


कुरुल (कटूसत्य वृत्त):- स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांची मोठी धावपळ पहायवास मिळाली. मोहोळ तालुक्यातील ६ जिल्हा परिषद व १२ पंचायत समितीच्या जागांसाठी एकूण १९१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून आज अखेरच्या दिवशी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेने जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे.

होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती च्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज अखेरच्या दिवशी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, भीमा शुगरचे व्हाईस चेअरमन सतीश जगताप, माजी उपसभापती मानाजी माने, रामदास चवरे, सुनीता अशोक भोसले, काजल अंकुश अवताडे, लखन शिंदे, ज्योत्स्ना पाटील, पार्वती कालिदास गावडे, बिरुदेव मोटे, सुलेमान तांबोळी, अश्विनी नरसिंह पाटील, शंकर वाघमारे, संजीव खिलारे, ॲड. विठोबा पुजारी, विशालसिंग पवार, वैशाली गोपाळ शेळके, मनिषा सिद्धराम म्हमाणे, विजय कोकाटे, राहुल मोरे, बाळासाहेब गायकवाड, अशोक सरवदे, समाधान खंदारे, स्वाती दीपक गवळी, संजय विभुते, पांडुरंग सरवळे, पृथ्वीराज पवार, अस्लम चौधरी, लखन माने यांच्यासह जिल्हा परिषदेसाठी ९० तर पंचायत समिती साठी १०१ असे एकूण १९१ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून यामध्ये एका उमेदवाराने दोन, तीन व चार असे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. यामध्ये उद्याच्या छाननी मध्ये अनेकांचे नामनिर्देशन पत्र बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी कुरुल ते मोहोळ शेकडो गाड्यांच्या तात्यासह येत मोहोळ येथे शक्ती प्रदर्शन केले, यांच्यासोबतच त्यांचे बंधू यांनी शिवसेनेकडून संतोष पाटील यांनी नरखेड ते मोहोळ असे शक्ती प्रदर्शन केले. तर भारतीय जनता पार्टी च्या लखन शिंदे, रामदास चवरे, कोमल अंकुश अवताडे, विमल तानाजी खताळ यांच्यासह भाजपच्या सर्व उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

चौकट-
' विद्यमान आमदारांनी दीड वर्षांत काय केले ; मानाजी मामा पाठिंबा देतील '

मला खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करता येत नाही. जे बोलतो तेच करतो. जे होत नाही त्याचा शब्द मी देत नाही. जनतेला खोट्या आश्वासनांची पूर्ण कल्पना आहे. ही निवडणूक आता जनतेने हाती घेतलेली आहे.माझे मामा मानाजी बापू माने यांच्यावर अन्याय झाला असला तरी ते मला मुलगा समजून नक्कीच पाठिंबा देतील अशी अपेक्षा आहे.विद्यमान आमदारांनी निवडून आल्यानंतर दीड वर्षांत काय केले, ते जनतेला माहित आहे. ते कोणत्या पक्षात आहेत. हे ही त्यांना कळत नाही. आम्ही राजन पाटील यांच्याशी निष्ठेने काम राहिलो आहोत. केवळ टीका करून राजकारण करता येत नाही, विकासासाठी काम करावे लागते.
- रामदास चवरे


चौकट-
▪️राजन पाटलांनी नव्या जुन्यांचा मेळ घालून न्याय दिला '
आमचे नेते माजी आमदार राजन पाटील यांनी उमेदवारी देत असताना जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घातला आहे.त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला माझे पती अंकुश अवताडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची ही पोहोच आहे.भारतीय जनता पार्टी ने माझ्यावर टाकलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडेन.

- कोमल अंकुश अवताडे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages