Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

 नेताजी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात




 सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- हुतात्मा स्मृती मंदिर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णाराव  कुंभार होते. प्रमुख अतिथी शेळगी केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत वाघमारे, सेवानिवृत्त प्राचार्य रेवणसिद्ध रोडगीकर , सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, सेवानिवृत्त प्राचार्य विजयकुमार हुल्ले, माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे,सेवानिवृत्त शिक्षक लक्ष्मीकांत त्रिशूले, धर्मराज बळ्ळारी, नेताजी महाविद्यालयाचे प्राचार्य रविशंकर कुंभार, राजराजेश्वरी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार,माध्यमिक प्रशालेचे  मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, माता पालक संघाच्या सदस्या भाग्यश्री बंदलगी, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष संतोष पुजारी आदी उपस्थित होेेते.
प्रथम मान्यवरांच्या हस्ते वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य व तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन व रंगमंचाचे पूजन करुन स्नेहसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले. मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार यांनी अहवाल वाचनात शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला व  पालकांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.संस्था अध्यक्ष  कुंभार म्हणाले, स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कला,कौशल्य व आत्मविश्वासाला नवे बळ मिळते. भविष्यात ही शाळेने गुणवत्तेचा दीप उजळवत समाजाला सक्षम पिढी देत राहावी.
 या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी गणपती गीत, नवीन वर्षाच्या स्वागताचे गीत, कोळीगीत देशभक्तीपर गीत,ऑपरेशन सिंदूर, शेतकरी गीत अशा  गाण्यावर बहारदार नृत्य सादर करुन पालक प्रेक्षकांना भारावून टाकले. बालवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्तम नृत्य अविष्काराने पालक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सहशिक्षक प्रशांत बत्तुल यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.

Reactions

Post a Comment

0 Comments