आयुक्त डॉ. ओम्बासे यांची कचरा संकलन केंद्राची पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या शहर विकास व नागरी सुविधा बळकटीकरणाच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज जुळे सोलापूर परिसरातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी रूपा भवानी चौक, लेप्रसी कॉलनी, जुळे सोलापूर येथे नागरिकांच्या सोयीसाठी नवीन रॅम्प तयार करण्यात येत असून, त्या कामाची पाहणी आयुक्तांनी केली. रॅम्पचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करावे, तसेच अधिक सुरक्षित व सुलभ वापर होईल, याची विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
तसेच इंद्रधनु येथील कचरा संकलन केंद्रात नवीन शेड उभारण्यात येणार असून, त्या प्रस्तावित कामाचीही आयुक्तांनी पाहणी केली. कचरा संकलन व व्यवस्थापन प्रक्रिया अधिक शिस्तबद्ध, स्वच्छ व पावसाळ्यातही सुरळीतपणे चालू राहण्यासाठी शेड उभारणी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या ठिकाणी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा व कामाच्या सोयींचा विचार करून कामाचे नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
शहरातील मूलभूत सुविधा सुधारणा, स्वच्छता व्यवस्था व नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी संबंधित कामांना महापालिकेच्या वतीने प्राधान्य देण्यात येत असून, कामांचा दर्जा व वेळेची पूर्तता यावर विशेष भर देण्यात येत असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पाहणी सह. आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे दरम्यान संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
.png)
0 Comments