मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचा १ तर पंचायत समितीचे ४ अर्ज अवैध
कुरुल (कटूसत्य वृत्त):- होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषद ९० तर पंचायत समिती १०१ नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. आज मोहोळ तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळे यांच्या प्रशासन प्रमुख उपस्थितीत अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. यामध्ये जिल्हा परिषद ८९ तर पंचायत समिती ९७ इतके अर्ज वैध ठरले तर जिल्हा परिषदेचा एक व पंचायत समितीचे चार अवैध झाले.
अंतिमरित्या स्विकारण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रांची संख्या जिल्हा परिषद ८९, तर पंचायत समिती ९७ इतकी राहिली आहे. यामध्ये जिल्हा परषिद गट नरखेड सुशिलकुमार कुबेर मोटे यांनी शपथ साक्षांकित न केल्याने अवैद्य ठरविण्यात आला आहे.पंचायत समिती गण सावळेश्वर मयुरी समाधान शेंडगे यांनी सूचक दुबार,कामती (बु.) गण अंजली जीवन गंगाणे अनामत रक्कम भरली नाही.पोखरापूर गण फुलचंद निवृत्ती सरवदे सूचक इतर गटातील, तर टाकळी सिकंदर गण स्वाती दिपक गवळी सूचक दुबारा झाल्याने अवैद्य ठरविण्यात आला आहे.जिल्हा परिषद १,पंचायत समिती ४ अशा पाच नामनिर्देशन पत्र अवैद्य ठरविण्यात आले आहेत.

0 Comments