कुणाचा भाऊ, कुणाची बायको, कुणाची मुलगी!
सोलापुरात ‘घराणेशाही’ निवडणुकीच्या रिंगणात; यादी पाहूनच संताप उसळणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- लोकशाही बळकट करण्यासाठी असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच आता घराणेशाहीच्या विळख्यात अडकत चालल्याचे विदारक चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने पुन्हा एकदा कुणाचा भाऊ, कुणाची पत्नी, कुणाची मुलगी, कुणाचा मुलगा अशा नातेसंबंधांवर आधारित उमेदवारांची यादी समोर आली असून, ही यादी वाचून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
एकाच घरातील दोन-तीन सदस्य वेगवेगळ्या गटांतून किंवा गणांतून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काही ठिकाणी विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या पत्नी, मुली किंवा भावांना थेट तिकीट देण्यात आले असून, अनेक पक्षांनी कर्तृत्वापेक्षा नातेसंबंधांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ते, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणारे निष्ठावान कार्यकर्ते पूर्णतः बाजूला पडल्याची भावना उघडपणे व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, बदल, पारदर्शकता आणि नव्या नेतृत्वाची भाषा करणारेच पक्ष प्रत्यक्षात मात्र

0 Comments