गोड्या पाण्याचे स्रोत आटल्याने जग ‘जल दिवाळखोरी’च्या उंबरठ्यावर
संयुक्त राष्ट्र विद्यापीठाचा गंभीर इशारा; पिण्याच्या पाण्यालाही इंधनासारखी मोजदाद लागणार
टोकियो (वृत्त सेवा):- जग आज केवळ पाणीटंचाईला सामोरे जात नाही, तर ‘जल दिवाळखोरी’ या अत्यंत भयावह संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. संयुक्त राष्ट्र विद्यापीठाने (यूएनयू) प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालात मानवजातीने गोड्या पाण्याच्या स्रोतांचा अमर्याद उपसा केल्यामुळे आता त्यांची नैसर्गिक भरपाई होणे जवळपास अशक्य झाल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. भूजल, नद्या, तलाव व जलाशय ही आपली नैसर्गिक ‘पुंजी’ आपण अक्षरशः संपवून टाकली असून, ही परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी अहवालात थेट ‘बँकरप्सी’ (दिवाळखोरी) हा शब्द वापरण्यात आला आहे.
अहवालानुसार, येत्या काळात शेती, उद्योग आणि नागरी जीवनासाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध होणे मोठे आव्हान ठरणार आहे. इतकेच नव्हे, तर पिण्याचे पाणीही भविष्यात पेट्रोल-डिझेलप्रमाणे मोजून-मापून वापरण्याची वेळ येणार असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
‘डे झीरो’च्या दिशेने जगातील महानगरे
यूएनयूच्या अहवालात जगातील अनेक शहरे ‘डे झीरो’ अर्थात नळांना पाणी पूर

0 Comments