Hot Posts

6/recent/ticker-posts

हळदी कुंकू सण हा महिलांच्या मैत्री आणि आनंदाचे प्रतिक- सोनल केत

 हळदी कुंकू सण हा महिलांच्या मैत्री आणि आनंदाचे प्रतिक- सोनल केत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- हळदी कुंकू हा एक पारंपारिक सामाजिक सोहळा आहे.सुवासिनी एकमेकींना हळद कुंकू लावुन सौभाग्यासाठी शुभेच्छा देतात.मकर संक्रातीच्या काळात  महिला एकत्र येऊन हा आनंद साजरा करतात.हा समारंभ महिलांच्या मैत्री आणि आनंदाचे प्रतिक आहे.असे मत सोनल केत यांनी व्यक्त केले.
  साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्थेच्यावतीने महिला सभासदांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी व्यासतीठावर नगरसेविका विजयाताई खरात,ज्ञानेश्वरी संगीतराव, आयेशा बिराजदार,महादेवी पाटील,फरजाना मरतुरे आदी उपस्थित होते.यावेळी नगरसेविका विजयाताई खरात,ज्ञानेश्वरी संगीतराव यांनी आपल्या  मनोगतामधुन हळदी कुंकू समारंभाचे महत्व विषद केले.उपस्थित महिला सभासदांना यावेळी पतसंस्थेच्यावतीने भेटवस्तु देण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संध्या सरवदे यांनी तर महादेवी पाटील यांनी आभार मानले.यावेळी महिला सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments