Hot Posts

6/recent/ticker-posts

आरोग्य व कायदा यांचा संगम साधणारे शिबिर उत्साहात संपन्न

 आरोग्य व कायदा यांचा संगम साधणारे शिबिर उत्साहात संपन्न






बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. बी. वाय. यादव साहेब व खजिनदार श्री बापू शितोळे सर , राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शीचे प्राचार्य प्रा. डॉ. रत्नदीप सोनकांबळे आणि श्री सत्य साईबाबा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुधीर अन्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
श्री सत्य साईबाबा मेडिकल ट्रस्ट व राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिर व कायदा-जनजागृती अभियान यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमास राजर्षी शाहू लॉ कॉलेजच्या मा. प्रा. सौ. माया मिठ्ठा, प्रा. सौ. हरदाडे, प्रा. ॲड. अनिकेत तायडे, प्रा. समाधान काळे, ग्रंथपाल श्री संभाजी शेळके तसेच श्री सत्य साई मेडिकल ट्रस्टचे डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मोठ्या संख्येने नागरिक, वृद्ध व गरजू व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. शिबिरामध्ये विविध आजारांवरील आरोग्य तपासण्या, प्राथमिक उपचार तसेच आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला. यासोबतच नागरिकांना मूलभूत हक्क, कर्तव्ये, मानसिक आरोग्य कायदा आणि कायदेशीर जनजागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश केवळ वैद्यकीय सेवा किंवा कायदेशीर माहितीपुरता मर्यादित न राहता, आरोग्य व न्याय यांचा परस्पर संबंध समाजासमोर प्रभावीपणे मांडणे हा होता. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ नागरिकच आपल्या हक्कांची जाणीव ठेवून कायद्याचा योग्य वापर करू शकतो, या भूमिकेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी प्राचार्य प्रा. डॉ. रत्नदीप सोनकांबळे यांनी
संविधानातील कलम 21 – जीवन व सन्मानाने जगण्याचा हक्क आणि राज्य धोरण निर्देशक तत्त्वांतील कलम 47 – सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी यांचा संदर्भ देत आरोग्य हे न्यायप्रक्रियेचे भक्कम अधिष्ठान असल्याचे स्पष्ट केले.
विद्यार्थी डॉ. आनंद मोरे यांनी “आरोग्य, कायदा आणि राष्ट्रनिर्मिती : Health Impact Assessment of Laws (HIA)”
या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की,
“आरोग्यम् धनसंपदा हा विचार वैयक्तिक नसून न्यायव्यवस्थेचा आत्मा आहे.
ज्या समाजात आरोग्याचा हक्क सुरक्षित नाही, तेथे न्यायव्यवस्था केवळ कागदावर उरते.”
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी राजर्षी शाहू लॉ कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी स्वयंसेवक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्या सेवाभावाचे व सामाजिक भानाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शी हे केवळ Fundamental Rights शिकवणारे नव्हे,
तर Directive Principles of State Policy कृतिशील उपक्रमांतून समाजात उतरवणारे
शैक्षणिक संस्थान असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. आरोग्य, विवेक, कायदा व करुणा यांच्या समन्वयातून सुदृढ समाज व सशक्त राष्ट्रनिर्मितीचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.


Reactions

Post a Comment

0 Comments