प्रशासन व पत्रकार यांच्यात चांगला समन्वय असावा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 8, 2026

प्रशासन व पत्रकार यांच्यात चांगला समन्वय असावा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

 प्रशासन  पत्रकार यांच्यात चांगला समन्वय असावा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते महसूल बीट प्रतिनिधी यांचा सन्मान


सोलापूर(कटूसत्यवृत्त):-मागील अडीच वर्षापासून जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमे विशेषतः महसूल बीट प्रतिनिधी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला खूप सहकार्य मिळालेले आहेत्यामुळे मागील वर्षी आलेली पूर परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळणे शक्य झालेजिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न  कामांमध्ये प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्याकडून वेळोवेळी माहिती मिळत गेल्याने त्यात आवश्यक बदल करून ती कामे मार्गी लावण्या प्रशासनाला मदत झालीत्यामुळे प्रशासन  पत्रकार यांच्यात पुढील काळात ही चांगला समन्वय असावाअसे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित महसूल बीट प्रतिनिधी यांचा पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आलायावेळी ते बोलत होतेयावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्केमराठी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक संचारचे प्रतिनिधी विक्रम खेलबुडेदैनिक पुण्यनगरी चे महेश पांढरेलोकमतचे बाळकृष्ण दोड्डीसकाळचे प्रमोद बोडकेतरुण भारतचे अविनाश गायकवाडतरुण भारत संवाद चे संतोष आचलरेएबीपी माझाचे आफताब शेखटीव्ही नाईन चे सागर सुरवसे त्यांच्यासह महसूल बीट चे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद हे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता चांगली असून ते प्रशासनाला नेहमी सहकार्य करत असतातमागील अडीच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत असताना पत्रकारांनी सहकार्याची भूमिका ठेवली  पुढे ही अशीच भूमिका कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केलेतसेच मागील वर्षी माझी सप्टेंबर  ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या पूर परिस्थितीमध्ये प्रशासन चांगल्या प्रकारे काम करून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे  तसेच पुरात अडकलेल्या अनेक नागरिकांना बचाव पथकामार्फत बचाव करण्यात प्रशासन यशस्वी झालेयावेळी प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्याची भूमिका ठेवल्याने प्रशासनाला अधिक गतीने काम करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी  कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यामध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचाही स्वीकार करून त्या पद्धतीने प्रशासनाने काम केलेवारीचे नियोजन ही त्यामुळे उत्कृष्ट झालेतसेच होटगी रोड विमानतळ येथून विमानसेवा सुरू करणेबोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवणेआयटी पार्क जागा निवडून सुरू करणेपंढरपूर येथील कॉरिडॉर अशा अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांमध्ये प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्य पूर्ण भूमिका बजावलीअसे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

                प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व महसूल बीट प्रतिनिधी यांचा यथोचित सन्मान करण्यात आलाया कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले तर आभार सकाळचे प्रतिनिधी प्रमोद बोडके यांनी मानले.

 

या कार्यक्रमास उपस्थित पत्रकार पुढील प्रमाणे :- श्री. विक्रम खेलबुडे, श्री. प्रमोद बोडके, श्री. महेश पांढरे, श्री. अविनाश गायकवाड, श्री. बाळकृष्ण दोड्डी, श्री. संजय येऊलकर, श्री. रमाकांत साळुंके, श्री. चंदन बोल्लू, श्री. मनोज भालेराव, श्री. संगमेश जेऊरे, श्री. अविनाश कुलकर्णी, श्री. राहूल रणदिवे, श्री. मुन्ना शेख, श्री. चंद्रशेखर गायकवाड, श्री. अनिल शिराळकर, श्री. शेखर गोतसुर्वे, श्री. अनिकेत गायकवाड, श्री. प्रितम पंडीत, श्री. सागर सुरवसे, श्री. वशीम अत्तार, श्री. अफताब शेख, श्री. सौरभ वाघमारे, श्री. विश्वभूषण लिमये, श्री. विश्वनाथ बिराजदार, श्री. प्रशांत कटारे, श्री. मनोज हलसुरे, श्री. शिवाजी सुरवसे, श्री. दयानंद मामड्याल, श्री. दिगंबर ईप्पलपल्ली.

00000

 


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages