Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग‎ २२‎ मध्ये भाजप उमेदवारांची‎ रामवाडीतील‎ गैबीपीर‎ नगरात‎ पदयात्रा

 प्रभाग‎ २२‎ मध्ये भाजप उमेदवारांची‎ रामवाडीतील‎ गैबीपीर‎ नगरात‎ पदयात्रा


महिलांसह‎ मुस्लिम बांधवांचा सहभाग;‎ सामाजिक‎ एकतेचा‎ संदेश

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर‎ महानगरपालिका‎ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२‎ मधील‎ भारतीय जनता पार्टीचे‎ अधिकृत उमेदवार किसन‎ जाधव, दत्तात्रय‎ नडगिरी,‎ सौ.‎ अंबिका नागेश गायकवाड व‎ सौ.‎ चैत्राली‎ शिवराज‎ गायकवाड‎ यांच्या‎ प्रचाराला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद‎ मिळत‎ असल्याचे चित्र‎ सध्या प्रभागात‎ दिसून येत आहे. याच अनुषंगाने बुधवारी‎ रामवाडी परिसरातील‎ गैबीपीर‎ नगर व लगतच्या भागात पदयात्रा व‎ मतदार संवाद कार्यक्रमाचे‎ आयोजन करण्यात आले होते.‎ या पदयात्रेत‎ महिलांसह मुस्लिम समाज‎ बांधवांची‎ मोठ्या संख्येने उपस्थिती दिसून‎ आली,‎ ज्यामुळे सामाजिक एकतेचा सकारात्मक‎ संदेश नागरिकांपर्यंत‎ पोहोचला.


माजी‎ नगरसेवक‎ नागेश‎ गायकवाड‎ तसेच लक्ष्मण जाधव‎ यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा पार पडली. प्रशासन राजवटीच्या काळात‎ नागरिकांना‎ भेडसावलेल्या‎ विविध‎ अडचणी, मूलभूत‎ सुविधांतील त्रुटी‎ तसेच‎ त्या‎ सोडवण्यासाठी करण्यात‎ आलेल्या‎ प्रयत्नांचा आढावा यावेळी मतदारांशी‎ संवाद साधत मांडण्यात आला.‎ आमदार देवेंद्र‎ कोठे यांच्या‎ माध्यमातून‎ तसेच महायुती सरकारच्या‎ सहकार्यातून‎ प्रभाग‎ २२ साठी कोट्यवधी‎ रुपयांचा‎ निधी‎ उपलब्ध झाल्याने रस्ते, पाणीपुरवठा,‎ स्वच्छता आदी कामांना‎ गती मिळाल्याचेही‎ सांगण्यात‎ आले.

                                                                                                                                                                                                                   

पुढील‎ काळात आरोग्य सुविधा बळकट‎ करणे, ज्येष्ठ‎ नागरिकांसाठी उद्यान,‎ बालगोपालांसाठी‎ चिल्ड्रन पार्क‎ तसेच स्वच्छता‎ विषयक भरीव‎ कामे‎ करण्याचा मानस‎ किसन‎ जाधव‎ यांनी‎ व्यक्त‎ केला. लाडक्या‎ बहिणी योजनेअंतर्गत‎ महिलांना भविष्यात‎ अधिक लाभ‎ मिळावा,‎ यासाठी शासन दरबारी प्राधान्याने‎ पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. विकासाच्या‎ जोरावर पुन्हा एकदा प्रभाग‎ २२‎ चे‎ नेतृत्व‎ करण्याची‎ संधी‎ द्यावी व‎ मतदानाच्या‎ रूपाने‎ आमच्या पाठीशी‎ ठामपणे‎ उभे‎ राहावे,‎ असे‎ आवाहनही‎ यावेळी‎ किसन जाधव यांनी मतदारांना केले. या पदयात्रेमुळे‎ विकास,‎ सामाजिक सलोखा‎ आणि विश्वासाचे वातावरण अधिक दृढ‎ झाल्याचे‎ दिसून आले.‎

Reactions

Post a Comment

0 Comments