Hot Posts

6/recent/ticker-posts

बक्षी हिप्परग्यात ‘ग्लोबल’तर्फे सर्वरोग निदान शिबिर

 बक्षी हिप्परग्यात ‘ग्लोबल’तर्फे सर्वरोग निदान शिबिर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्लोबल व्हिलेज कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, बोरामणी आणि अश्विनी रुरल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज, कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने बक्षी हिप्परगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्वरोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण २६५ रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन अश्विनी रुरल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिद्धेश्वर करजखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्लोबल व्हिलेज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. मालापूर व डी. पुजारी उपस्थित होते.
शिबिरात डॉ. आनंदराव आगलावे, डॉ. पूर्वा घोवारीकर, डॉ. अमेय साखरकारकर, डॉ. सरफराज खान, डॉ. आदर्श शिरा व डॉ. मिलिंद सानेर यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले तसेच आरोग्यविषयक योग्य सल्ला दिला. या शिबिराचा लाभ ग्रामस्थ, विद्यार्थी तसेच आबालवृद्ध रुग्णांनी मोठ्या प्रमाणावर घेतला.
आरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी रुरल हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेजच्या जनसंपर्क अधिकारी साधना साळवे, रूपाली स्वामी, ज्योती जोगुरे तसेच फार्मासिस्ट नल्ला बिलाल यांनी तज्ज्ञ डॉक्टरांना सहकार्य केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सोमनाथ स्वामी, कार्यक्रमाधिकारी प्रा. प्रदीप राठोड, प्रा. पंढरीनाथ हरिदास, जुबेर चौकी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी आयोजित केलेले हे शिबिर उपयुक्त ठरल्याची प्रतिक्रिया उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Reactions

Post a Comment

0 Comments