एन बी नवले सिंहगडच्या वार्षिक क्रीडा सप्ताहास प्रारंभ
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा सप्ताहाचे अर्थात एन्थुझिया–2K25 चे माजी विद्यार्थी तथा आंतरराष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू श्वेतांबरी मालप - होमकर यांच्या हस्ते सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा व शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व देण्याच्या उद्देशाने कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मुलींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. सर्व क्रीडा प्रकारात मुलींनी हिरिरीने सहभाग नोंदविला आहे.
या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटक श्वेतांबरी मालप- होमकर यांनी आपण याच सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग पूर्ण केल्याचे सांगत याच महाविद्यालयाच्या योगदानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले असल्याचे सांगितले. कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्यासह सर्व विभाग प्रमुखाचे वेळोवेळी सहकार्य लाभल्याचे नमूद केले.
यावेळेस माजी कुलगुरू तथा सीआरटीडीचे संचालक प्रा. एस. एच. पवार, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. आर. टी. व्यवहारे, निबंधक डॉ. डी. आय. नवले, पब्लिक स्कूलच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले यांची उपस्थिती होती.
संपूर्ण क्रीडा सप्ताहाचे नियोजन व अंमलबजावणी डॉ. के. सी. मुजावर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.
ENTHUSIA-2K25 अंतर्गत क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, खो-खो, हॉकी, टेबल टेनिस, कॅरम, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स आदी विविध मैदानी व मैदानी क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण व क्रीडावृत्ती विकसित होण्यास मदत होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. ENTHUSIA-2K25 क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
रक्तदान शिबिरात 70 जणांचे रक्तदान
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळचे चेअरमन प्रा. एम. एन. नवले सर यांच्या वाढदिवसानिमित्त 30 डिसेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले. यात 70 शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी रक्तदान केले.
.png)
0 Comments