Hot Posts

6/recent/ticker-posts

ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या युवक अध्यक्षपदी संदीप राठोड यांची निवड

 ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या युवक अध्यक्षपदी संदीप राठोड यांची निवड




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा युवक अध्यक्षपदी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती भामला तांडा येथील तरुण कार्यकर्ते संदीप धोंडीराम राठोड यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बापूराव राठोड यांनी करून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.

संदीप राठोड हे अभियांत्रिकी पदवीधर असून बंजारा समाजात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध मूलभूत समस्यांच्या सोडवणुकीसाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. युवकांना संघटित करून समाजाच्या विकासासाठी दिशा देण्याचे काम त्यांनी आतापर्यंत केले असून त्यांच्या कार्याची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

या निवडीबद्दल अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, माजी नगरसेवक प्रा. भोजराज पवार, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप अण्णा राठोड, मोतीराम भाऊ राठोड, लाला भाऊ राठोड, लालसिंग राजपूत सर, सुनील कळके यांच्यासह अनेक मान्यवरांनी संदीप राठोड यांचे अभिनंदन केले आहे. तसेच पुढील काळात बंजारा समाजाच्या संघटनात्मक कार्यासाठी त्यांनी प्रभावीपणे नेतृत्व करावे, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

जिल्हा युवक अध्यक्ष म्हणून संदीप राठोड युवकांना संघटित करून समाजाच्या हक्कांसाठी, शिक्षण, रोजगार व सामाजिक विकासासाठी सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निवडीमुळे बंजारा समाजातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटनेच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments