नेताजी खंडागळे यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित कॅलेंडरचे भव्य अनावरण
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट येथे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते नेताजीभाऊ खंडागळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व विकासाभिमुख कार्यावर आधारित कॅलेंडरचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास नागरिक, कार्यकर्ते व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी नेताजीभाऊ खंडागळे यांच्या सातत्यपूर्ण व लोकहिताच्या कार्याचा विशेष उल्लेख करत त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी त्यांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याचे आमदारांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, आरोग्य व विकासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास अक्कलकोटचे नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेशदादा बिराजदार, महादेव शिंदे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी कॅलेंडरच्या माध्यमातून नेताजीभाऊ खंडागळे यांच्या कार्याचा व्यापक परिचय समाजापर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी नेताजीभाऊ खंडागळे यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देत त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात सकारात्मक चर्चा व समाधान व्यक्त करण्यात आले.
या कॅलेंडरमुळे नेताजीभाऊ खंडागळे यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीसमोर मांडला जाईल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
.png)
0 Comments