Hot Posts

6/recent/ticker-posts

भविष्यात एखादा विद्यार्थी अब्दुल कलाम घडू शकतो- राम सातपुते

 भविष्यात एखादा विद्यार्थी अब्दुल कलाम घडू शकतो- राम सातपुते



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना जर शिक्षकांनी पंख लावले तर अशक्य काही नाही उद्याच्या भविष्यामध्ये चांगले विद्यार्थी घडतील या देशाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातील विद्यार्थी म्हणजे उद्याचा भारत आहे यांच्यामध्ये आपण संस्काराची पेरणी केली चांगले विद्यार्थी घडविले तर निश्चित यातून भविष्यात एखांदा विद्यार्थी अब्दुल कलाम घडू शकतो असे प्रतिपादन मा. आ. राम सातपुते यांनी केले.
           ते नातेपुते एज्युकेशन सोसायटीच्या ७० व्या वर्धापन दिन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी बोलत होते.ते पुढे बोलत असताना म्हणाले की, एखादे रोपटे लावणे, त्याचे वटवृक्ष होणे याच्यामध्ये जर विचार केला तर अनेकांनी याच्यासाठी स्वतःचे जीवन, वेळ समर्पित केलेला असतो. त्यानंतर एखादी संस्था उभा राहते व ती टिकते. अनेक पालक या प्रशालेमध्ये शिकले आहेत. इंग्रजी माध्यमाच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी या प्रशाले वरती श्रद्धा असणाऱ्या पालकांनी आपली मुलं या दाते प्रशालेमध्ये ठेवले आहेत. शाळेचे संचालक मंडळ चांगल्या पद्धतीने ही शाळा चालवत आहेत. गावाला शाळेबद्दल वेगळी अस्था आहे. विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा व आपली प्रशाला विद्यार्थ्यांनी स्वच्छ ठेवावी.दाते प्रशालेने अधिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, वकील, डॉक्टर असे अनेक लोक या घडविले या घडवण्यामध्ये त्या काळाच्या शिक्षकांचा सिंहाचा मोठा वाटा असल्याचे मत मा.आ.राम सातपुते यांनी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. राम सातपुते प्रमुख व्याख्याते गणेश शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बाहुबली चंकेश्वरा तसेच अँड. डी. एन. काळे, धैर्यशील देशमुख संतोष काळे जनरल सेक्रेटरी अँड शिवाजीराव पिसाळ संचालक डॉक्टर एम पी मोरे अरविंद पाठक महेश शेटे डॉक्टर वर्धमान जोशी संजय कुमार गांधी जवाहर इंगोले इमाम मुलानी मुख्याध्यापक विनायक देशपांडे प्राथमिक विभाग मुख्याध्यापक कुंडलिक इंगळे उपप्राचार्य भारत पांढरे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब चांगण नातेपुते शहराध्यक्ष राजेंद्र पांढरे बाळासाहेब पांढरे संजय उराडे आदी. मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली.मुख्याध्यापक विनायक देशपांडे यांनी आई-वडिलांच्या स्मरणार्थ शाळेला दीड लाख रुपयांचे डिजिटल लॅब उपलब्ध करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद परचंडे यांनी केले असून प्रास्ताविक अँड. शिवाजीराव पिसाळ यांनी केले तर आभार संतोष काळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


चौकटीत :

असाध्य गोष्ट जर साध्य करायचे असेल तर त्यासाठी संघर्ष अभ्यास करावा लागेल आणि त्या कष्टांना योग्य दिशा द्यावी लागेल. नाहीतर पोरगं काय करायला गेले की बापाने सांगायचे अंथरून पाहून पाय पसर, पोरगं हातपाय खोडून मरून गेलं पण बापाने पाय पसरू दिले नाहीत. बापाने तर सांगितले पाहिजे. हातपाय पसर अंथूर्णाचे काय ते तुझा बाप बघेल एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरा मध्ये निर्माण करता आली पाहिजे. स्वाभिमान येतो तो आत्मविश्वासातून ज्ञानग्रहण करा कौशल्य आत्मसात करण्यासाठी अपेक्षित असणारा आत्मविश्वास तुमच्यात असला पाहिजे.

प्रा. गणेश शिंदे ( प्रमुख व्याख्याते )

Reactions

Post a Comment

0 Comments