धर्मांध महायुतीला मातीत गाडण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज- कॉ. आडम मास्तर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. धर्मांध भाजप व त्यांच्या भांडवली घटक पक्षांच्या महायुतीला मातीत गाडण्यासाठी महाविकास आघाडी जंग जंग पछाडणार आहे, असे ठाम मत ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांनी व्यक्त केले.
सत्तापिपासू भाजपकडून निवडणुकीत प्रलोभने, खोटी आमिषे व खोटी आश्वासने देऊन मते मागितली जातील. तसेच सत्तेच्या दबावाखाली निवडणूक आयोग, प्रशासन व पोलीस प्रशासनाचा गैरवापर केला जात आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून तो मुक्त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. जर प्रशासन व पोलीस यंत्रणा सत्तेच्या दबावाखाली वागत असतील, तर त्याला खंबीरपणे टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असा इशाराही त्यांनी दिला.
गुरुवार, दिनांक 1 जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात पक्षाचे जिल्हा सचिव मेजर कॉ. युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा उत्साहात पार पडला.
या मेळाव्यात महाविकास आघाडीचे उमेदवार दत्तू अण्णा बंदपट्टे, गीता वासम, अरुणा आडम, ॲड. सुरेश गायकवाड, श्रीनिवास म्हेत्रे, सुषमा सरवदे, अनिता आडम ,वल्लभ चौगुले यांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी सर्व उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करत परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला.
या मेळाव्याचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड अनिल वासम यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व व्यासपीठावर कॉ. दत्ता चव्हाण, कॉ. व्यंकटेश कोंगारी, कामिनीताई आडम, मुरलीधर सुंचू, अशोक बल्ला, रंगप्पा मरेड्डी, कुरमय्या म्हेत्रे, विक्रम कलबुर्गी, वीरेंद्र पद्मा, बालकृष्ण मल्याळ, बाबू कोकणे, लिंगवा सोलापूरे, अकील शेख, मल्लेशाम कारमपुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
.png)
0 Comments