Hot Posts

6/recent/ticker-posts

उजनी ऑर्चर्डस फार्मर प्रोड्युसर कंपनीची यशोगाथा

 उजनी ऑर्चर्डस फार्मर प्रोड्युसर कंपनीची यशोगाथा




 शेतकऱ्यांच्या केळीची थेट निर्यात

वाशिंबे (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरातील युवा शेतकऱ्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. आपला माल आपणच विकायचा या हेतूने वाशिंबे ता.करमाळा येथील उजनी ऑर्चर्डस फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या युवा संचालकांनी किंग बनाना एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार केळींची निर्यात करून थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठली आहे. ही कंपनी शेतकरी-मालकीची असून, युवा शेतकरीच्या नेतृत्वाखाली ती कार्यरत आहे. या यशामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण केला असून,भारतीय शेतीच्या जागतिक स्तरावरील क्षमतेचा पुरावा मिळाला आहे.

उजनी ऑर्चर्डस फार्मर प्रोड्युसर कंपनी ही एप्रिल २०२५ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून कामाचे मुख्यालय वाशिंबे, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन झोळ यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकरी संचालकांची टीम कार्यरत आहे. वाशिंबे केळी पिकाच्या उत्पादनात समृद्ध तसेच वेलची केळीचे हब तयार झाले आहे.सर्व तरुण शेतकरी पारंपरिक शेतीतून आधुनिक निर्यात-केंद्रित व्यवसायाकडे वळले आहेत.उजनी धरणाच्या सिंचनामुळे समृद्ध असलेल्या या भागातील काळ्या मातीमध्ये उगवलेल्या कॅव्हेंडिश प्रकारच्या (ग्रँड जैन - जी९, विल्यम्स ) केळींची त्यांनी निर्यात सुरू केली आहे.
कंपनीने किंग बनाना ( King Banana ) हे ब्रँड विकसित केले असून, त्याअंतर्गत केळींची निर्यात होत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये इराक, इराण, सौदी अरेबिया, ओमान,येथे केळींच्या कंटेनर पाठवण्यात आले. या केळींची वैशिष्ट्ये म्हणजे नैसर्गिक गोडवा, १२-२० दिवसांचा शेल्फ लाइफ, १८-२२ सेमी लांबी आणि ३६-४२ मिमी व्यास. दरमहा १२० मेट्रिक टन क्षमता असलेल्या या कंपनीकडे एपीईडीए,एफएसएसएआय आणि अॅगमार्क प्रमाणपत्रे आहेत.

निर्यात प्रक्रियेत शेतापासून जहाजापर्यंत पूर्ण पारदर्शकता आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब केला जातो. शीतसाखळी, स्वच्छता आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पॅकेजिंग यामुळे या केळी जागतिक बाजारात लोकप्रिय होत आहेत.अवघ्या २ महिन्यात आतापर्यंत २१ कंटेनर एक्सपोर्ट केले आहे आहेत.
कंपनीच्या वतीने ओमान, दुबई,सोंदी अरेबिया, इराकमध्ये विदेशी दौरे करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संपूर्ण माहिती मिळाली आहे.कंपनीचे संचालक  शेतकरी यांची शेतीविषयक माहिती संकलित साठी महाराष्ट्र राज्य शासना मार्फत विदेशी दौऱ्यात निवड झाली आहे.

अनेक शेतकरीची उच्च दर्जाची केळी घेऊन थेट निर्यात केली, ज्यामुळे चांगला भाव मिळला. शेतकऱ्यांच्या  FPC कंपनीने निर्यात करून यश मिळवले आहे.पुढेही हा प्रवास सुरू राहील.
शेतकरी उत्पादन कंपनी म्हणजे सरकारची योजना नव्हे, तर शेतकऱ्यांच्या हाती सत्ता देणारे साधन आहे.
जर शेतकरी एकत्र आले, योग्य नियोजन करून,दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला, तर ग्रामीण भागातूनही मोठे, शाश्वत आणि यशस्वी उद्योग उभे राहू शकतात.
शेतकरीनीं स्वतःवर विश्वास ठेवला, तर शेतीतूनही उद्योग घडतो. टिम किंग बनाना एक्सपोर्ट कंपनीने साध्य करत आहे.

"आम्ही शेतकरी आहोत आणि आमच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. उजनी परिसरातील अनेक  शेतकऱ्यांना याचा फायदा होईल," असे संचालक सुभाष झोळ यांनी सांगितले. कंपनी भविष्यात आंबा, डाळिंब, कांदा, नारळ यांचीही निर्यात करण्याच्या तयारीत आहे.
या यशामुळे आमच्या ग्रामीण शेती क्षेत्रात नवीन क्रांतीची सुरुवात झाली आहे. सरकारच्या योजनांच्या मदतीने अशा युवा उद्योजकांना प्रोत्साहन मिळले. उजनी ऑर्चर्डसची ही कहाणी इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

Reactions

Post a Comment

0 Comments