Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्य; स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद-अजित पवार

 पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्यस्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद-अजित पवार



 

पुणे (कटूसत्य वृत्त):-  “भारत माता की जय”, “जय भवानी जय शिवाजी”, “गणपती बाप्पा मोरया” अशा घोषणांनीशाळेच्या मुलांनी शिवकाळातील वेशभुषा केलेले शिवराज्याभिषेकाचे सादरीकरण आणि सासवडकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने भारलेल्या वातावरणात ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याची सासवड नगर परिषद परिसरात सुरूवात झालीउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झेंडी दाखवून या टप्प्याच शुभारंभ करण्यात आलायावेळी उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष सायकलपटूंशी संवाद साधून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

कार्यक्रमाला राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारआमदार विजय शिवतारेमाजी आमदार संजय जगतापनगराध्यक्ष आनंदी जगतापजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,  महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सचिव संजय शेटे आदी उपस्थित होते.

   उपमुख्यमंत्री पवार म्हणालेपुणेपिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण पुणे जिल्ह्याने नेहमीच खेळांना प्राधान्य दिले आहेनागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याशिवाय खेळाडूंनाही आनंद आणि प्रेरणा मिळत नाहीया स्पर्धेसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले असून स्पर्धेचे मार्ग अत्यंत दर्जेदार आहेतरस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक ज्या पद्धतीने प्रोत्साहन देत आहेतत्यामुळे सायकलपटूंना विशेष ऊर्जा मिळत असल्याची भावना खेळाडूंनी व्यक्त केल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

 

या स्पर्धेच्या आयोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहेकेंद्र सरकारराज्य शासन आणि संपूर्ण पुणे जिल्हा प्रशासन एकत्रितपणे काम करीत असून बजाजसिरम इन्स्टिट्यूट यांसारख्या नामांकित कंपन्या तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी सक्रिय सहभाग नोंदवत आहेतअशी माहितीही त्यांनी दिलीसासवडकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले.

 

बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याची एकूण लांबी १३७. किलोमीटर असून हा टप्पा सासवड येथून सुरू होऊन सुपेपानवडी घाटकाळदरी (बोरी फाटा), मांढरमाहूरपरींचेहरणीवाल्हेपिसुर्टीनीराब्राह्मणधरामुर्टीमोरगावतरडोलीजळगाव ., कऱ्हावागजखंडोबानगरपिंपळीलिमटेककन्हेरीरुई रोड सावळवंजारवाडी मार्गे विद्या प्रतिष्ठान कलाविज्ञान  वाणिज्य महाविद्यालयबारामती येथे संपन्न झालामार्गावरील प्रत्येक गावात नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून टाळ्याशिट्ट्याघोषणाबाजी आणि विविध वाद्यांच्या निनादात सायकलपटूंना उत्साहाने प्रोत्साहन दिलेगावोगावी रस्ते सजविण्यात आले होतेचौकाचौकात ‘पुणे ग्रँड टूरचे कटआऊट्स लावण्यात आले होतेत्यामुळे संपूर्ण मार्गावर उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

आजच्या स्पर्धेतील क्षणचित्रे

 

▪️ उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी सायकलपटूंशी संवाद साधलासायकलींची

   पाहणी करत खेळाडूंचा उत्साह वाढविला.

▪️ रस्त्याच्या दुतर्फा सासवडकरांनी मोठी गर्दी केली होतीअनेकांच्या हातात भारतीय तिरंगा डौलाने फडकत

   होता.

▪️ सायकलपटूंनी शर्यतीदरम्यान प्रेक्षकांच्या दिशेने हात उंचावत ‘हाय-फाईव्ह’ देत प्रतिसाद दिलाज्यामुळे

   वातावरण अधिकच चैतन्यमय झाले.

▪️ स्पर्धेचा शुभंकर (Mascot) लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचे आकर्षण ठरला.

▪️ संपूर्ण परिसर ‘पुणे ग्रँड टूरच्या फलकांनी सजला होताशिस्तबद्ध आयोजन  पोलिसांच्या चोख बंदोबस्तात

  तिसरा टप्पा यशस्वीपणे पार पडला.

 

Reactions

Post a Comment

0 Comments