सोलापूर(कटूसत्यवृत्त):- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सीट बेल्ट व हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता या रॅलीस प्रारंभ झाला. सदर रॅलीचे उद्घाटन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील, व सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी असिफ मुल्लाणी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे वाहतूक नियमांबाबत जनजागृती होऊन जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
रॅलीचा मार्ग प्रादेशिक परिवहन कार्यालय, कंबर तलाव, सात रस्ता, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक, रामलाल चौक, पार्क चौक, डफरीन चौक, रंगभवन, सात रस्ता, गांधी नगर, होटगी रोड, आसरा चौक, डी-मार्ट, दावत चौक, भारती विद्यापीठ मार्गे पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय असा होता.
या रॅलीमध्ये परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी, ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी तसेच बाईकर्स ग्रुप सोलापूरचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांनी वाहन चालवताना नेहमी हेल्मेटचा व सीट बेल्टचा वापर करावा, वेगमर्यादा आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.
.jpeg)
0 Comments