आमदार देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी मोनिका कोठे उतरल्या प्रचाराच्या मैदानात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुक प्रचाराच्या मैदानात आमदार देवेंद्र कोठे यांच्या धर्मपत्नी मोनिका कोठे यादेखील उतरल्या आहेत. मोनिका कोठे यांनी प्रभाग क्रमांक २१ आणि प्रभाग क्रमांक १५ मधील विविध नगरात उमेदवारांसह फिरून होम टू होम प्रचारावर भर दिला आहे.
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये भाजपच्या पॅनल मधील सर्व उमेदवार निवडून यावेत याकरिता शहर मध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे संपूर्ण विधानसभा पिंजून काढत आहेत. त्यांना धर्मपत्नी मोनिका कोठे यांचीही मोलाची साथ लाभत असल्याने प्रचाराने आता आणखी वेग घेतला आहे.
मोनिका कोठे यांनी प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपाचे उमेदवार संगीता जाधव, शिवाजी वाघमोडे, मंजिरी किल्लेदार, सात्विक बडवे यांच्या प्रचारार्थ वेणूगोपाल नगर, लतादेवी नगर, न्यू आनंद नगर, प्रियदर्शनी नगर, मार्कंडेय नगर या नगरांमधील नागरिकांच्या भेटी घेतल्या.
तसेच प्रभाग १५ क्रमांक मधील भाजपचे उमेदवार श्रीदेवी फुलारे, विजया खरात, विनोद भोसले आणि अंबादास करगुळे यांच्या प्रचारार्थ जुनी मिल चाळ, पाटील चाळ, एन.जी. मिल चाळ, वारद चाळ, येथे होम टू होम प्रचार केला. तसेच यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांचा कार्य अहवाल नागरिकांना दिला. प्रभाग क्रमांक २१ आणि प्रभाग क्रमांक १५ च्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या सर्व उमेदवारांना नागरिकांनी मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्यावे, असे आवाहनही मोनिका कोठे यांनी यावेळी नागरिकांना केले.
याप्रसंगी मोनिका कोठे यांच्यासह प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपाचे उमेदवार संगीता जाधव, शिवाजी वाघमोडे, मंजिरी किल्लेदार, सात्विक बडवे, प्रभाग १५ क्रमांक मधील भाजपचे उमेदवार श्रीदेवी फुलारे, विजया खरात, विनोद भोसले आणि अंबादास करगुळे, रवी भवानी, पूजा वाघमोडे, अर्जुन जाधव, रसिका बडवे, अबोली गलगली, श्रीकांत गलगली, निरंजन रत्नपारखी, स्वरूपा अंकम, विशाल अंकम, आदी उपस्थित होते.

0 Comments