Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग सहा मधील शेटे नगरवासीयांचा भाजपला एकमुखी जाहीर पाठिंबा

 प्रभाग सहा मधील शेटे नगरवासीयांचा भाजपला एकमुखी जाहीर पाठिंबा

 




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी होम टू होम प्रचार,लाडक्या बहिनींच्या बैठका, पदयात्राच्या माध्यमातून चांगलाच जोर पकडला आहे. दररोज उमेदवारांसह हजारो कार्यकर्ते प्रभागातील प्रत्येक घर पिंजून काढत आहेत.पायाला भिंगरी लावून भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी पोहोचून विकास कामे सांगत आहेत.
  दरम्यान प्रभाग क्रमांक सहा मधील शेटे नगरवासीयांनी गुरुवारी सायंकाळी झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांच्या शब्दाला मान देत भाजपाचे उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी एकमुखी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.विकासाच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प करत भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना भरभरून मते देण्याचा संकल्प यावेळी सोडण्यात आला.
  परिसरामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, उद्यान,ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅक आदी अडचणी या भागाचे निष्णात वकील महेश जगताप यांनी मांडल्यानंतर ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर यांनी या मागण्या सोडविण्याचा सर्वांसमक्ष शब्द दिला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर नगरसेवक गणेश वानकर यांनी या भागात विकास कामे केली आहेत.  आगामी काळात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शेटे नगरवासियांसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासह उद्यान,ओपन जिम  आणि वॉकिंग ट्रॅक सह अन्य अडचणी सोडविण्याचा शब्द मिळाल्यानंतर शेटे         नगरवासीयांनी भाजपच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत टाळ्यांचा एकच कडकडाट केला. यावेळी भाजपचे उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड यांनी शेटे नगरवासीयांच्या विकासासाठी सज्ज असल्याचे अभिवचन दिले.
  यावेळी माजी नगरसेविका सुनीता कारंडे, किरण फडके, देवेंद्र माने, प्रसाद माने,कार्तिक यादव, प्रवीण पाटील,ओंकार दिवटे,अभि भोसले, सिद्धांत धावडे,बालाजी लोहार,महादेव गवळी, भीमा गायकवाड,जीवन माने, संदीप काशीद,अशोक बनसोडे,औदुंबर जगताप यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments