Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपाला मत म्हणजे‎ विकासाला मत- किसन‎ जाधव

 भाजपाला मत म्हणजे‎ विकासाला मत- किसन‎ जाधव




प्रभाग २२ साठी‎ भरघोस‎ निधीची‎ ग्वाही देत कॉर्नर‎ सभांतून निर्धार


सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):-‎ सोलापूर‎ महानगरपालिका‎ निवडणुकीच्या‎ पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक‎ २२ मध्ये‎ भारतीय‎ जनता‎ पार्टीचे अधिकृत उमेदवार‎ किसन‎ जाधव,‎ दत्तात्रय‎ नडगिरी, सौ. अंबिका‎ नागेश‎ गायकवाड व‎ सौ. चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या‎ प्रचाराला मतदारांचा‎ उत्स्फूर्त‎ प्रतिसाद‎ मिळत आहे.‎ गुरुवारी सायंकाळी लिमयेवाडीतील‎ एकमल्ले चौक‎ येथे भीम‎ ज्योत तरुण मंडळाच्या वतीने‎ आयोजित कॉर्नर सभेत गौतम‎ फडतरे, सागर‎ एक्कमले, अभिजीत‎ फडतरे, राहुल‎ एक्कमले, बाबू‎ फडतरे,‎ संजय‎ कांबळे, सचिन‎ फडतरे‎ व विराज‎ जाधव आदी उपस्थित होते. यावेळी‎ शिवराज‎ गायकवाड यांनी‎ मनोगत‎ व्यक्त‎ करताना‎ सांगितले‎ की,‎ प्रभाग २२‎ च्या‎ सर्वांगीण‎ विकासासाठी‎ किसन‎ जाधव‎ आणि‎ नागेश‎ गायकवाड‎ यांनी‎ कोट्यवधी‎ रुपयांचा निधी आणून‎ अनेक‎ मूलभूत सुविधा उपलब्ध करून‎ दिल्या. या‎ विकासाभिमुख‎ नेतृत्वाला‎ मतदारांनी‎ पुन्हा संधी द्यावी,‎ असे आवाहन त्यांनी‎ केले.‎ भाजपाचे उमेदवार किसन‎ जाधव यांनी सांगितले‎ की, यापूर्वीही प्रभाग‎ २२‎ मध्ये रस्ते,‎ पाणी,‎ ड्रेनेज व नागरी‎ सुविधांसाठी‎ मोठ्या प्रमाणावर‎ निधी‎ आणून‎ कामे केली‎ आहेत. मात्र विरोधक‎ त्या कामांचे‎ श्रेय लाटण्याचा‎ प्रयत्न करीत असून मतदारांची दिशाभूल करत‎ आहेत.‎ आता केंद्रात आणि राज्यात भाजपची‎ सत्ता‎ आहे आणि‎ सोलापूर‎ शहर‎ मध्य‎ विधानसभा‎ मतदारसंघाचे‎ आमदारही भाजपाचे‎ असल्याने प्रभाग‎ २२ च्या‎ विकासासाठी निधी कमी पडणार‎ नाही.‎ विकासासाठी आम्ही‎ कधीच राजकारण केले नाही; पुढील काळात‎ पालकमंत्री जयकुमार गोरे‎ आणि आमदार देवेंद्र‎ कोठे‎ यांच्या माध्यमातून‎ आणखी भरघोस निधी आणून प्रभागाचा‎ सर्वांगीण‎ विकास साधू,‎ अशी‎ ग्वाही‎ त्यांनी दिली. दरम्यान,‎ विघ्नहर्ता‎ गणेशोत्सव महिला‎ मंडळाच्या वतीने‎ भाजपा उमेदवारांना पाठिंबा जाहीर‎ करण्यासाठी‎ आयोजित‎ कॉर्नर सभेत‎ प्रमिला‎ जाधव, दीपक‎ जाधव, श्रीनिवास‎ गायकवाड, शिवलाल‎ भानावत‎ व चंद्रकांत‎ गायकवाड यांच्या उपस्थितीत भाजपाच्या‎ चारही‎ उमेदवारांना जाहीर पाठिंबा‎ देण्यात‎ आला.‎ भाजपाला‎ मत‎ म्हणजे‎ विकासाला मत. आता प्रभाग‎ २२‎ चा‎ विकास‎ थांबणार‎ नाही,‎ असा‎ निर्धार व्यक्त‎ करण्यात आला. मतदारांनी‎ विकासाच्या दृष्टीने भाजपाच्या पाठीशी‎ खंबीर‎ उभे‎ राहावे, असे आवाहन यावेळी‎ उमेदवारांनी केले.‎

Reactions

Post a Comment

0 Comments