Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग २५ मध्ये पुन्हा संधी मिळाल्यास दुप्पट विकास करू : वैभव हत्तुरे

 प्रभाग २५ मध्ये पुन्हा संधी मिळाल्यास दुप्पट विकास करू : वैभव हत्तुरे



राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद; जनसंवादातून विकासाचा अजेंडा मांडला
सोलापूर (कटूसत्य वृत्त) – गेल्या टर्ममध्ये प्रभाग २५ मध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली असून रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा यासह विविध मूलभूत सुविधांचा भक्कम पाया घालण्यात आला आहे. नागरिकांनी पुन्हा संधी दिल्यास गतवेळीपेक्षा यंदा दुप्पट विकासकामे करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार वैभव हत्तुरे यांनी व्यक्त केला.
प्रभाग २५ मधील उमेदवार वैभव हत्तुरे, सुकेशिनी गंगोंडा आणि सुरेखा काळे यांनी बुधवारी भाग्यश्री चौक, रामलाल नगर, भारतमाता नगर यासह प्रभागातील विविध भागांत पदयात्रा काढून थेट नागरिकांशी संवाद साधला. या पदयात्रेला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी बोलताना वैभव हत्तुरे म्हणाले की, “अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ड्रेनेज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यश आले आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पुढील टप्प्यात प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला जाणार आहे.”
पुढील टप्प्यातील विकासाचा आराखडा
हत्तुरे यांनी पुढील काळातील विकासाचा आराखडा मांडताना सांगितले की, प्रभागात उद्याने विकसित करणे, नागरिकांसाठी व्यायामाच्या सुविधा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. महिलांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र योजना आखण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संघटनात्मक ताकदीचा प्रत्यय
यावेळी उमेदवार सुकेशिनी गंगोंडा आणि सुरेखा काळे यांनीही नागरिकांशी संवाद साधत गेल्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा घेतला आणि भविष्यातील विकासाचा अजेंडा मांडला. पदयात्रेदरम्यान नागरिकांनी विविध प्रश्न व सूचना मांडल्या, त्यावर तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
या जनसंवाद कार्यक्रमाला प्रा. वैजिनाथ हत्तुरे, वीरपाक्ष चिवरे, काशिनाथ बिराजदार, रवि पारशेट्टी, सचिन पाटील, स्वप्नील कोटाणे, शिवराज कोटाणे, चेतन हिप्परगे, ऋषिकेष ताटे, राहुल जगताप, शुभम माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments