Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची तोफ धडाडणार

 भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची तोफ धडाडणार 





कुरुल येथे २९ जानेवारी रोजी सभा

कुरुल (कटूसत्य वृत्त):- होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे रणांगण चांगलेच तापले असून मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कुरुल (ता. मोहोळ) येथे उद्या गुरुवार दि. २९ जानेवारी तोफ धडाडणार आहे. 

दरम्यान मोहोळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेसाठी ६ तर पंचायत समितीसाठी १२ उमेदवार असून उद्या होणाऱ्या या प्रचाराच्या सभेसाठी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील, सपोनि ज्ञानेश्वर उदार, माजी आमदार यशवंत माने, कुरुल जि.प. गटाचे उमेदवार तथा जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे, समाधान वाघमोडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अंकुश आवताडे, तालुका उपाध्यक्ष लहू वाघमोडे, कुरूल पंचायत समिती गणाचे उमेदवार, बिरुदेव मोटे, जालिंदर लांडे, सुरेश जाधव, भाऊसाहेब पाटील, आनंद जाधव, महेश जाधव आदी उपस्थित होते. 


Reactions

Post a Comment

0 Comments